Shocking News x
देश विदेश

Shocking : लग्न करण्यास नकार दिल्याने हत्या, प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरला विष देऊन संपवलं

Shocking News : एका प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लग्नाला नकार दिल्याने कंटेंट क्रिएटरची विष देऊन हत्या करण्यात आली आहे.

Yash Shirke

  • एका कंटेंट क्रिएटरची विष देऊन हत्या करण्यात आली आहे.

  • लग्नास नकार दिल्याने विषारी गोळ्या देऊन संपवल्याची माहिती समोर आली आहे.

  • कंटेंट क्रिएटरच्या मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

Crime : एका कंटेंट क्रिएटरचा तिच्या घरात संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहेत. या कंटेंट क्रिएटरचे टिकटॉकवर ५८,००० फॉलोअर्स आहेत. तिची मुलगी देखील सोशल मीडियावर सक्रीय आहे. ही घटना पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टिकटॉक स्टार आणि कंटेंट क्रिएटर सुमिरा राजपूतचा तिच्या घरात मृत्यू झाला. काही लोक सुमिराला लग्न करण्यासाठी भाग पाडत होते. तिने नकार दिल्याने विषारी गोळ्या देऊन तिला मारण्यात आले, असा दावा सुमिरा राजपूतच्या १५ वर्षीय मुलीने केला आहे. सुमिरा राजपूत ही पाकिस्तानमधील प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर आहे. सुमिरा आणि तिच्या बहिणीचे मिळून १ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सुमिरा राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असले तरीस अद्याप कोणताही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.

गेल्या महिन्यामध्ये पाकिस्तानमध्ये १७ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर सना युसूफची इस्लामाबादमधील तिच्या घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सना युसूफची हत्या करणारा तरुण गरीब होता. फक्त मॅट्रिकची परीक्षा पास झालेल्या या तरुणाने सनाला अनेकदा लग्नाची मागणी घातली होती. पण तिने प्रत्येक वेळी नकार दिला होता. यावरुन आरोपीने सनावर गोळी झाडल्या होत्या.

पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगच्या वाढत्या घटना

इस्लामाबादस्थित स्वतंत्र संस्था सस्टेनेबल सोशल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच एसएसडीओनुसार, २०२४ मध्ये देशभरात ३२ हजारांपेक्षा अधिक लैंगिक हिंसाचाराची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यापैकी ५४७ ऑनर किलिंगची प्रकरणे होती. या आकडेवारीवरुन पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT