Pakistan government denies viral reports of a weekend lockdown amid ongoing fuel crisis concerns. Saam Tv
देश विदेश

इंधन संकटामुळे भारताच्या शेजारील देशात लॉकडाउन, लग्न समारंभाही रद्द

Pakistan Smart Lockdown Truth 2026: पाकिस्तानमध्ये इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Omkar Sonawane

पाकिस्तानमधील स्मार्ट लॉकडाऊनसंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट बनावट असल्याचे सरकारने फेटाळून लावले आहे. माहिती मंत्री अत्ताउल्लाह तार यांनी सांगितले की, अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र व्हायरल झालेल्या प्रस्तावानुसार आठवड्याच्या शेवटी लॉकडाऊन, बाजारपेठा बंद ठेवणे आणि अधिक कठोर निर्बंध लागू करण्याची तरतूद आहे, ज्यावर सरकार विचार करत आहे.

पाकिस्तानचे माहिती मंत्री, अताउल्लाह तार यांनी सांगितले की, सोशल मीडियावर पसरत असलेले 'स्मार्ट लॉकडाऊन'चे वृत्त खोटे आहे. व्हायरल झालेली सूचना बनावट आहे. त्यांनी लोकांना अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. सरकारने स्पष्ट केले की, 'स्मार्ट लॉकडाऊन' अद्याप लागू करण्यात आलेला नाही. सरकार या विषयावर प्रांत आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. 'स्मार्ट लॉकडाऊन'बाबतचा अंतिम निर्णय सर्वांचे मत विचारात घेतल्यानंतरच घेतला जाईल.

लॉकडाऊनबाबतचा एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानुसार संपूर्ण देश शनिवार आणि रविवार या दिवशी पूर्ण लॉकडाऊनखाली असेल. हा नियम ४ आणि ५ एप्रिल २०२६ पासून लागू होईल. लॉकडाऊन प्रत्येक शनिवारी मध्यरात्री १२:०१ वाजता सुरू होईल आणि रविवारी रात्री ११:५९ पर्यंत सुरू राहील. या कालावधीत सर्व दुकाने, बाजारपेठा, कारखाने आणि इतर व्यवसाय पूर्णपणे बंद राहतील. सेवा क्षेत्रही बंद राहील. या दिवसांमध्ये सार्वजनिक किंवा व्यावसायिक ठिकाणी लग्न आणि इतर समारंभांना परवानगी दिली जाणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

SCROLL FOR NEXT