Imran Khan Saam Tv
देश विदेश

Pakistan News : इम्रान खान यांना दणका; पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अयोग्य घोषित; नेमकं काय आहे प्रकरण?

सत्ताधारी आघाडी सरकारच्या खासदारांनी ऑगस्टमध्ये इम्रान खान यांच्या विरोधात पाकिस्तानच्या निवडणूक आयोगासमोर खटला दाखल केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कराची : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना निवडणूक आयोगाने मोठा झटका दिला आहे. आयोगाने इम्रान खान यांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे इम्रान खान यांचे निकटवर्तीय फवाद चौधरी यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानात परदेशी नेत्यांकडून कोणतीही भेटवस्तू सरकारी तिजोरीत जमा करावी लागतात. मात्र इम्रान खान यांनी या मौल्यवान भेटवस्तूंची माहिती लपवून ठेवल्याचा आणि अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

सत्ताधारी आघाडी सरकारच्या खासदारांनी ऑगस्टमध्ये इम्रान खान यांच्या विरोधात पाकिस्तानच्या निवडणूक आयोगासमोर खटला दाखल केला होता. इम्रान खान यांनी गिफ्ट मिळालेली तीन घड्याळं एका स्थानिक व्यापाऱ्याला 15.4 कोटी रुपयांना विकले होते, असा आरोप विरोधकांनी केला आहे. (Latest News)

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने वृत्त दिले आहे की, आयुक्त सिकंदर सुलतान राजा यांनी मुख्य निवडणुकीच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय खंडपीठात ही घोषणा केली आणि इस्लामाबादमधील ECP सचिवालयात हा निकाल दिला. इम्रान खान सत्तेत असताना आणि अरब देशांच्या दौऱ्यांदरम्यान त्यांना भेटवस्तू मिळाल्या होत्या. या भेटवस्तू शासकीय खजिन्यात जमा कराव्या लागतात.

नंतर काही रक्कम भरून ते विकत घेता येतात. इम्रान खान यांनी बेकायदेशीररित्या भेटवस्तू खरेदी केल्या होत्या. या भेटवस्तू कोणतीही रक्कम न भरता चढ्या भावाने विकल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर काही अत्यंत महागड्या भेटवस्तूंची माहितीही देण्यात आली नाही किंवा त्या सरकारकडे जमा केल्या नाहीत. पाकिस्तान डेमोक्रेटिक मुव्हमेंट (PDM) च्या खासदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर कारवाई करत निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला. मात्र या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर आयोगाने 19 सप्टेंबर रोजी कारवाईच्या समाप्तीवरील निर्णय राखून ठेवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: एक है तो सेफ है...., मोदी सरकारच्या नाऱ्याची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, थेट व्हिडीओ दाखवला

Amit Shaha News : सत्ता स्थापनेच्या बैठकीत शरद पवार होते? अमित शहा यांचा मोठा खुलासा, पाहा Video

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

Peanut And Jaggery: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

SCROLL FOR NEXT