Pakistan Flood Saam Tv
देश विदेश

पाकिस्तानामध्ये अतिवृष्टीमुळे परिस्थिती बिघडली, ९०० हून अधिक लोकांचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे पाकिस्तानमधील अनेक भाग जलमय झाले आहेत.

साम वृत्तसंथा

लाहोर: मुसळधार पावसामुळे (Rain) पाकिस्तानमधील अनेक भाग जलमय झाले आहेत. त्यामुळे लोकांना स्थलांतर करावे लागत आहे. पाकिस्तानमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात आतापर्यंत मृतांची संख्या ९०० हून अधिक झाली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान, सिंध, पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा या चार प्रांतातील रहिवाशांना या पुराचा फटका बसला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केलेल्या अहवालात गेल्या २४ तासात सुमारे ७३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, ८२,०३३ घरांचे नुकसान झाले असून ७१० जणावरे ठार झाली आहेत. १९१ महिलांसह सुमारे ४०० जणांना मुसळधार पाऊस (Rain) आणि पूरसंबंधित घटनांमुळे जीव गमवावा लागला आहे. तर १००० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

शाहबाज शरीफ यांच्या आवाहनावर आंतरराष्ट्रीय संस्थांनी गुरुवारी पाकिस्तानच्या मदतीसाठी ५० कोटी डॉलर्सची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. 'दक्षिण पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, यामध्ये सिंधमधील २३ जिल्हे आपत्तीग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. दक्षिण भागात सिंधमध्ये ७८४% जास्त पाऊस झाला आहे. या हंगामातील सामान्य सरासरी पावसाच्या (Rain) तुलनेत ही आकडेवारी चिंताजनक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT