Pakistan Saam Tv
देश विदेश

Pakistan: युद्धामुळे कंगाल पाकिस्तानची आर्थिक कोंडी, फेडावं लागणार अब्जावधी डॉलर्सचं कर्ज

Pakistan in Crisis: इराण-इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका पाकिस्तानला बसत आहे. युद्धामुळे कंगाल पाकिस्तान आर्थिक कोंडीत सापडला आहे. पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सचं कर्ज फेडावं लागणार आहे.

Priya More

Summary -

  • पाकिस्तानवर आर्थिक संकट अधिक गडद

  • यूएईचे 3.5 अब्ज डॉलर्स कर्ज एका महिन्यात फेडण्याची वेळ

  • राजकीय तणावामुळे मुदतवाढ नाकारली

  • परकीय चलन साठ्यावर मोठा ताण

एकीकडे इराणचा शेजार आणि दुसरीकडे UAE कडून मिळणारी आर्थिक रसद... या दोन दगडांवर पाय ठेवलेला कंगाल पाकिस्तान आता पूर्णपणे उघडा पडलाय. आखाती युद्धानं पाकिस्तानसमोर कसं नवं आव्हान उभं राहिलंय ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

आखाती युद्धात भीक नको पण कुत्रं आवर अशी अवस्था झालेल्य पाकिस्तानसमोर नवं आर्थिक आव्हान उभं ठाकलंय. आर्थिक संकटात सापडलेल्या कंगाल पाकिस्ताननं धक्कादायक निर्णय घेतलाय. संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईचं तब्बल 3.5 अब्ज डॉलर्सचं कर्ज एका महिन्यात फेडण्याचा निर्णय पाकिस्ताननं जाहीर केलाय. इतकंच नाही तर युएईचं अब्जावधी डॉलर्सचं कर्ज परतफेडीचं वेळापत्रकही पाकिस्ताननं जाहीर केलंय.

पाकिस्तानच्या 'एक्सप्रेस ट्रिब्यून'ने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान शहबाज शरीफ सरकार येत्या काही आठवड्यांत टप्प्याटप्प्याने कर्जाची रक्कम वितरित करण्याची योजना आखत आहे. यामध्ये 1996-97 मध्ये घेतलेल्या 450 दशलक्ष डॉलर्सच्या जुन्या कर्जाचा समावेश असून 11 एप्रिलला कर्ज फेडले जाईल. त्यानंतर, 17 एप्रिलला 2 अब्ज डॉलर्स आणि 23 एप्रिलला 1 अब्ज डॉलर्स टप्प्याटप्प्याने फेडले जातील. विशेषतः, एका महिन्याच्या आत पाकिस्तानला युरोबॉन्ड्ससह एकूण 4.8 अब्ज डॉलर्स द्यावे लागतील.

महत्त्वाचं म्हणजे, कंगाल पाकिस्तानचं कर्जफेडण्यामागचं कारणही समोर आलंय. युएईनं कर्ज परतफेडीसाठी मुदत वाढवण्यास नकार दिल्यामुळे आणि दोन्ही देशांमधील राजकीय संबंधांतील तणावामुळे पाकिस्ताननं हे पाऊल टाकल्याचं बोललं जातंय.

पश्चिम आशियात परिस्थिती बिघडत चाललेली आहे. दुसरीकडे पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यातील तणाव वाढलाय. तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धात पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेमुळे UAE नाराज आहे. UAE अमेरीका, इस्रायलच्या बाजूनं आहे. तर पाकिस्तान या युद्धात इराणच्या बाजुने झुकलेला आहे. त्यामुळेच UAE ने पाकिस्तानला कर्जाची मुदतवाढ नाकारली असल्याची चर्चा आहे.

पाकिस्तानकडे सध्या सुमारे 16 अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा आहे. आता कर्जफेडीनुसार 3.5 अब्ज डॉलर्स एकाच महिन्यात वितरित केल्यानं पाकिस्तानच्या तिजोरीलाच मोठं भगदाड पडणार आहे. खरंतर, उधारीवरची मिजास फार काळ टिकत नाही. त्यामुळे ज्या UAE ने आतापर्यंत तारलं, त्यांनीच आता हात झटकल्यामुळे कंगाल पाकिस्तानची अवस्था 'इकडे आड तिकडे विहीर' अशी झालीये, एव्हंढ मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Batatyache Dhirde Recipe: खमंग आणि चविष्ट नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा बटाट्याचे धिरडे, नोट करा रेसिपी

Maharashtra News Live Update: मंत्री उदय सामंत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल

महापौर अन् उपमहापौर फिल्डवर; अधिकाऱ्यांची झाडाझडती, पाहा VIDEO

Chanakya Niti: या ५ सवयींमुळं लोक घेतात तुमचा गैरफायदा, स्वतःला बदला, अन्यथा...

Bachchu kadu : बच्चू कडूंचा पक्ष शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार? काय म्हणाले 'प्रहार'चे कार्यकर्ते? VIDEO

SCROLL FOR NEXT