Baluchistan Saam
देश विदेश

Pakistan: पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी

Balochistan Liberation Army Strikes Pakistan: बलुचिस्तानमधील बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर जोरदार हल्ले चढवत गॅस पाइपलाइनही उडवून दिले आहेत.

Bhagyashree Kamble

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे. बुधवारी आणि गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानने केलेल्या कुरघोड्यांना भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बलुच लेखक मीर यार बलोच यांनी बलुचिस्तानला पाकिस्तानकडून स्वातंत्र देण्यात यावं, अशी मागणी केली आहे.

यावेळी बलुचिस्तानमधील बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर जोरदार हल्ले चढवत गॅस पाइपलाइनही उडवून दिले आहेत. या घडामोडींमुळे पाकिस्तानला दुहेरी धक्का बसला आहे.

बीएलएचे हल्ले

बीएलएने दावा केला आहे की, त्यांनी पाकव्याप्त बलुचिस्तानमधील कीच, मास्टुंग आणि काची या भागांत पाकिस्तानी सैन्यांवर एकाचवेळी सहा ठिकाणी हल्ले केले आहेत. जमरान परिसरातील स्फोटात पाकिस्तानी लष्कराचा एक जवान ठार झाला आहे, तर इतर ठिकाणी झालेल्या सशस्त्र हल्ल्यांमुळे लष्कराला मोठ्या प्रमाणावर जीवित आणि आर्थिक नुकसान झाले आहे.

बीएलएने लष्करी सामान वाहून नेणाऱ्या ट्रकवर बॉम्बस्फोट घडवून आणला तसेच युफोन कंपनीच्या मोबाईल टॉवरचे नुकसान केले. संघटनेने स्थानिक लोकांना इशारा दिला आहे की, पाकिस्तानी सैन्याला मदत करू नये, अन्यथा त्यांना जबाबदार धरले जाईल. बीएलएने या सर्व कारवायांची जबाबदारी स्वीकारली असून, हे बलुच स्वातंत्र्यलढ्याचा भाग असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानची परिस्थिती बिघडली

बीएलएने पाकिस्तानवर त्यावेळी हल्ला चढवला,जेव्हा पाकिस्तान आणि भारताचे ड्रोन आणि हवाई हल्ले सुरू होते. आता पाकिस्तानला स्वतःच्या देशातील फुटीरतावादी कारवायांना सामोरे जावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT