Imran Khan saam tv
देश विदेश

Imran Khan Arrested: भेटवस्तू घोटाळाप्रकरणी इम्रान खान यांना 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा; 5 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी!

Imran Khan: इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ; पाकिस्तानी कोर्टाकडून ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Ruchika Jadhav

Imran Khan News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तोषखाना केसप्रकरणी इम्रान खान यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीये. यामुळे पुढील ५ वर्षे इमरान खान यांना निवडणूक देखील लढवता येणार नाही.

तोषखाना प्रकरण आहे तरी काय?

परदेशातील मान्यवरांकडून कोणतीही भेटवस्तू मिळाल्यास ती स्टेट डिपॉझिटरी म्हणजेच तोशाखान्यात ठेवावी लागते, असं पाकिस्तानच्या कायद्यात नमुद आहे.

राज्याच्या प्रमुखाला जेव्हा भेटवस्तू ठेवायची असते तेव्हा त्याला त्या भेटवस्तूच्या किंमतीइतकी रक्कम द्यावी लागेल. लिलाव प्रक्रियेद्वारे हे ठरवले जाते. त्यातून मिळणारा पैसा राष्ट्रीय तिजोरीत जमा केला जातो.

इम्रान खान यांनी तोशखाना येथून सवलतीच्या दरात मिळालेल्या महागड्या ग्राफ रिस्टवॉचसह विविध भेटवस्तू पंतप्रधान असताना नफ्यात विकल्याचा आरोप करण्यात आला होता. इम्रान खान यांना सुमारे १४ कोटी रुपयांच्या ५८ भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्या त्यांनी घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता.

एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांनी या भेटवस्तू तोशाखान्यातून २.१५ कोटी रुपयांना विकत घेतल्या होत्या आणि त्या बाहेर विकून ५.८ कोटी रुपयांचा नफा कमावला. यात एक महागडा पेन, एक अंगठी, चार रोलेक्स घड्याळं, एक ग्राफ घड्याळ, कफलिंकची एक जोडी यांचा समावेश होता. याच प्रकरणी इम्रान खान यांना आता ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

SCROLL FOR NEXT