Turkey Earthquake Saam Tv
देश विदेश

Turkey Earthquake : पाकिस्तान कधी सुधारणार? भूकंपग्रस्त तुर्कस्तानात मदत घेऊन जाणारं भारताचं विमान रोखलं

भारतीय विमानाला मदत सामग्री पोहोचवण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागला.

वृत्तसंस्था

Turkey Earthquake Latest Update News : तुर्कस्तानमध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे आतापर्यंत ५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. भूकंपाची तीव्रता पाहून संपूर्ण जगाने तुर्कस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे. हे पाहता भारताने एनडीआरएफच्या नेतृत्वाखाली तुर्कस्तानलाही मदत सामग्री पाठवली आहे.

या संकट काळात एकीकडे भारताने मदतीसाठी पुढे केला असताना पाकिस्ताननं पुन्हा एकदा आपलं नाक खुपसलं आहे. पाकिस्तानने तुर्कीसाठी मदत घेऊन जाणाऱ्या भारतीय विमानांना हवाई हद्दीत प्रवेश नाकारला आहे. यामुळे भारतीय विमानाला मदत सामग्री पोहोचवण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागला.

मदत सामग्री लवकरात लवकर तुर्कस्तानमध्ये (Trukey) पोहोचली पाहिजे आणि तिथल्या लोकांना यातून काहीसा दिलासा मिळावा, या दृष्टीने भारताने पाकिस्तानकडे आपली हवाई हद्द वापरण्याची परवानगी मागितली होती.

मात्र, पाकिस्तानने भारतीय एनडीआरएफ विमानाला हवाई हद्द वापरण्याची परवानगी देण्यास नकार दिला. दरम्यान, पाकिस्तानच्या या कृत्यामुळे भारताला मदत सामग्री पोहोचवण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागला.

तुर्कीचे भारतातील राजदूत यांनी तुर्कीला मदत केल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत. फिरात सुनेलने भारताचे आभार मानले आणि म्हणाले, संकट काळत जो आपल्या मदतीला धावतो तोच खरा मित्र असतो असे ट्विट त्यांनी केले आहे.

सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

तुर्कस्तान आणि सीरियासह चार देश भूकंपामुळे हादरले आहेत. तुर्कस्तानमधील नुरदगीपासून २३ किमी पूर्वेला भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचा परिणाम सीरियापर्यंत दिसून आला. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या.

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.८ इतकी मोजली गेली. शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून अनेक बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तुर्कीमध्ये आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे देशाची मोठी हानी झाला आहे. यामुळे सरकारकडून सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT