Pakistan economy crisis google
देश विदेश

युद्धाने कंबरडं मोडलं, कर्मचार्‍यांच्या पगारात ३० टक्के कपात; परदेश दौऱ्यावरही बंदी, शेजारी राष्ट्र भिकेला लागलं

Pakistan economy crisis : पाकिस्तानातील सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात ३० टक्के कपात करण्यात आली आहे. मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

Vishal Gangurde

युद्ध आणि इंधन दरवाढीमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात

सरकारी आणि निम-सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात

सरकारी खर्च कमी करण्यासाठी अनेक निर्बंध

पश्चिम आशियात अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमध्ये १४ दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाची झळ आशियातील देशाला बसायला सुरुवात झाली आहे. भारतातही गॅसता तुटवडा जाणवत आहे. तर पाकिस्तानचंही युद्धाने कंबरडं मोडलं आहे. यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी कठोर पावले उचलली आहेत. शरीफ यांनी सरकारी कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगार ५ ते ३० टक्क्यांपर्यंत कपातीला मंजुरीला दिली आहे.

पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी उच्च स्तरीय बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला. इंधनाचे दर वाढल्याने पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. पंतप्रधानच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत पेट्रोल-डिझेलचे दर आणि सरकारी खर्चात कपात करण्यासाठी उपाययोजनेवर चर्चा करण्यात आली.

'सरकारी कंपन्या, निम सरकारी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगारात ५ ते ३० टक्क्यांपर्यंत कपात होईल. या पगार कपातीमधून मिळणारी रक्कम लोकांच्या कल्याणासाठी वापरली जाईल,असे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानात मागील शुक्रवारी पेट्रोल प्रति लिटर ५५ रुपयांनी वाढले. बैठकीत अधिकाऱ्यांनाही सांगण्यात आले आहे की, सरकारी वाहनांमध्ये इंधन भरण्यावरही मर्यादा आणल्या आहेत. पुढील दोन महिन्यात शासकीय कर्मचाऱ्यांकडून सरकारी वाहनांचा वापर केला जाणार नाही, असेही आदेश देण्यात आले आहेत.

पालिका आणि संस्थांच्या भागदाराकांना लाभांश मिळणार नाही. नवी वाहन खरेदी आणि अन्य सरकारी खरेदीवरही बंधने लादण्यात आली आहेत. कॅबिनेट सदस्य, मंत्री , सल्लागार यांच्या पगार कपातीची रक्कम जल कल्याणासाठी वापरी जाईल. पंतप्रधानांनी म्हटलं की, 'सरकारी अधिकारी, मंत्री, राज्यमंत्री आणि विशेष सहायकाच्या विदेश यात्रांवर बंदी घातली आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाची मोठी झळ पाकिस्तानला बसत असल्याचे समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यावर बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र प्रकरणी कारवाई

Face Care: चेहरा धुतल्यानंतर २ मिनिटांच्या आत करा हे काम; मेकअपशिवायही ग्लो करेल चेहरा

तुकाराम मुंढे यांचा शाळांसाठी नवा आदेश; शाळेतील मध्यान्ह भोजनासाठी FDAची नवी नियमावली

Thursday Horoscope : आळस टाळा, 4 राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

SCROLL FOR NEXT