India-pakistan update saam tv
देश विदेश

Pakistan Conspiracy : पाकिस्तानच्या भारताविरुद्ध कुरघोड्या सुरुच; खलिस्तानींना भडकवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर

प्रविण वाकचौरे

Delhi News :

आर्थिक संकटामुळे भिकेला लागलेला पाकिस्तान याही परिस्थिती भारताविरुद्ध कुरुघोड्या करण्यात व्यस्त आहे. भारताविरुद्ध कट कारस्थान रचण्याची एकही संधी पाकिस्तान सोडत आहे. त्यात दहशतवाद्यांसोबतच आता पाकिस्तानची खलिस्तानींशीही मैत्री वाढली आहे. ही मैत्री द्वेषावर आधारित आहे. कारण पाकिस्तान खलिस्तानींना भारताविरुद्ध भडकवण्यासाठी सोशल मीडियाचा शस्त्र म्हणून वापर करत आहे. NIAच्या सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे.

खलिस्तानी दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि खलिस्तानींना भारताविरुद्ध भडकवण्यासाठी पाकिस्तानकडून 30 हून अधिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI आणि खलिस्तानी दहशतवादी मिळून भारतासह संपूर्ण जगात 30 हून अधिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एबीपी न्यूजने यााबबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (Latest Marathi News)

पाकिस्तानचा डाव लक्षात आल्याने भारतीय तपास यंत्रणांही संतर्क झाल्या आहेत. भारतीय तपास यंत्रणा संशयास्पद ३० हून अधिक प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पाकिस्तानमधून कार्यरत आहेत. या संपूर्ण कामात पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIचा मोठा हात असल्याचीही माहिती आहे.

एनआयएने एक यादी जारी केली आहे. ज्यामध्ये खलिस्तानी दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या काही सोशल मीडिया चॅनल्सची माहिती देण्यात आली आहे.

यूट्यूबवर 'आज भी बोले सोनेहल, खलिस्तान जिंदाबाद' नावाचे एक यूट्यूब चॅनल आहे. यावरुन सातत्याने भारतविरोधी अजेंडा पुढे रेटला जात आहे. त्याचा आयपी अॅड्रेस (IP Address) पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आहे.

त्यांतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर GKhalistan786 नावान एक अकाऊंट आहे. याद्वारे खलिस्तान समर्थक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जातात. या खात्याचा आयपी अॅड्रेसही पाकिस्तानातील कराची शहरातील आहे. तसेच फेसबूकवर Khalistan Movement 2020 नावाचं एक पेज आहे. जे पाकिस्तानच्या फैसलाबादहून ऑपरेट केलं जात आहे. (Latest Politics News)

ही फक्त प्रातिनिधीक उदाहरणं आहेत. अशा विविध मार्गांनी पाकिस्तान खलिस्तांनीची माथी माफी भडकवून त्यांचा भारताविरुद्ध वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र भारताने आता सतर्क होत, आपली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT