Pakistan Bolan Jafar Express Hijack Saam Tv News
देश विदेश

Jaffar Express Hijack : बोगद्यातून बाहेर पडताच रुळांवर स्फोट, पाकिस्तानातील जाफर एक्स्प्रेस कशी हायजॅक झाली?

Pakistan Jaffar Express Hijack : बीएलएच्या आर्मीने जाफर एक्स्प्रेस हायजॅक केली केलीय. बोलान परिसर डोंगराळ असल्याने लोहमार्गावर बोगदे आहेत. जाफर एक्स्प्रेस एका बोगद्यात असताना हल्ला झाला.

Prashant Patil

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये बलुच आर्मीने एक ट्रेन हायजॅक केलीय. या ट्रेनमध्ये ५०० हून अधिक प्रवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. आमच्याविरोधात कोणतीही लष्करी कारवाई केल्यास सगळ्या प्रवाशांना ठार करु, अशी थेट धमकी बीएलएकडून देण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बीएलएने सरकारला ही धमकी दिली आहे. नेमकी ही ट्रेन कशी हायजॅक केलीय ती माहिती आता समोर आलीय.

बीएलएच्या आर्मीने जाफर एक्स्प्रेस हायजॅक केली केलीय. बोलान परिसर डोंगराळ असल्याने लोहमार्गावर बोगदे आहेत. जाफर एक्स्प्रेस एका बोगद्यात असताना हल्ला झाला. ट्रेन सकाळी ९ वाजता क्वेटाहून निघाली होती. ही ट्रेन बोगदा क्रमांक ८ मध्ये शिरताच ट्रॅकवर स्फोट झाला. त्यामुळे ट्रेन थांबली. यानंतर हल्लेखोरांनी ट्रेनच्या इंजीनवर गोळीबार केला, आणि त्यात चालक जखमी झाला.

बीएलएच्या आर्मीने जाफर एक्स्प्रेस हायजॅक केली. त्यांच्या या कारवाईने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. बोलानच्या मस्काफ परिसरात जाफर एक्स्प्रेसवर हल्ला केला गेला. ट्रेनचा चालक जखमी आहे. या भागात सुरक्षा दलांना पाठवण्यात आलेलं आहे. हा संपूर्ण परिसर डोंगराळ असून तिथे सुरक्षा दलांचे कर्मचारी पोहोचत आहेत, अशी माहिती बलुचिस्तान प्रांत प्रशासनाचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी दिली.

दरम्यान, प्रवाशांमध्ये पोलीस, पाकिस्तानी लष्कर, दहशतवाद विरोधी दल आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे कर्मचारी आहेत. हे सर्वजण पंजाबला जात होते. ट्रेनमध्ये उपस्थित सैनिकांनी कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास सर्वांना मारण्यात येईल, असा इशारा बलोच आर्मीने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT