Abdul Rehman Makki Died Saam Tv News
देश विदेश

Abdul Rehman Makki Died: भारताच्या मोठ्या शत्रूचा पाकिस्तानात मृत्यू, ह्रदयविकाराच्या झटक्यानं अब्दुल रहमान मक्कीनं जीव सोडला

Pakistan-Based Lashkar Terrorist Abdul Rehman Died: मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रहमान मक्की याचा मृत्यू झालाय. तो ७६ वर्षांचा होता.

Bhagyashree Kamble

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रहमान मक्की याचा मृत्यू झालाय. तो ७६ वर्षांचा होता. वाँटेड दहशतवादी हाफिज अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू पाकिस्तानात झाला. रिपोर्टनुसार हाफिज अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू हार्ट अॅटकनं रूग्णालयात झालाय. २०२३ साली मक्कीला संयुक्त राष्ट्रानं जागतिक दहशतवादी घोषित केलं होतं. ज्या अंतर्गत त्याची संपत्ती जप्त करण्यात आली होती. मक्की लष्कर ए तैयबाचा उपप्रमुख आणि हाफिज मोहम्मद सईदचा नातेवाईक होता.

ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

हाफिज अब्दुल रहमान मक्की याचा शुक्रवारी ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. तो मुंबई हल्ल्याचा सूत्रधार, दहशतवादी हाफिज सईदचा मेहुणा आणि बंदी घातलेल्या जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होता. जमात उद दावाच्या म्हणण्यांनुसार, अब्दुल रहमान मक्की हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर लाहोरमधील एका खासगी रूग्णालयात मधुमेहावर उपचार सुरू होते.

जमात उद दावाच्या अधिकाऱ्यानं पीटीआयला सांगितलं की, 'अब्दुल रहमान मक्की याला आज सकाळी ह्रदयविकाराचा झटका आला होता. मक्की मागच्या अनेक दिवसांपासून आजारी होता. लाहोरमधील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. तो मधुमेहामुळे ग्रस्त होता. मात्र रूग्णालयातच मक्कीचा मृत्यू झाला.'

टेरेर फंडिंग प्रकरणात ६ महिन्यांची शिक्षा सुनावली

जेयूडीचा प्रमुख हाफिज सईदचा मेहुणा मक्की याला पाकिस्तानच्या दहशतवादीविरोधी न्यायलयानं २०२० मध्ये टेरर फंडिंग प्रकरणात ६ महिन्यांची शिक्षा सुनावली होती. मिळालेल्या माहितीनुसार टेरर फंडिंग प्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतर मक्कीनं आपल्या हालचाली कमी केल्या होत्या. पाकिस्कतान मुताहिदा लीगनं एका निवेदनात म्हटलं की, मक्की हा पाकिस्तानी विचारसरणीचे समर्थक होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुट्टीच्या दिवशी मंत्रालयाचा कारभार वेगात; रविवारी सरकारने काढले तब्बल 207 जीआर|VIDEO

Maharashtra Live News Update: बैलगाडा शर्यतीत थरार! बैलाची घोडीवरून उडी; मोठा अपघात टळला

New Labour Code: वर्षभरात ग्रॅच्युटी, बेसिक सॅलरी वाढणार; बुधवारपासून नवा कामगार कायदा,वाचा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

Kuwait attack news: मोठी बातमी! कुवैतमधील वीज प्रकल्प उद्ध्वस्त, भारतीय कामगाराचा मृत्यू

Sun Tan Removal Tips: 3 दिवसात गायब होईल चेहऱ्यावरचं टॅनिंग, हा देसी उपाय नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT