Pakistan VS India Saam Tv
देश विदेश

Pakistan VS India: ...तर अर्ध जग घेऊन बुडू, पाकिस्तानची भारताला अमेरिकेतून धमकी

Operation Sindoor: पाकिस्तानने भारताला पुन्हा हल्ल्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेतून भारताला क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकी दिली. ऑपरेशन सिंदूरनंतरचा हा त्यांचा दुसरा अमेरिका दौरा आहे.

Priya More

Summary -

  • पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली.

  • अमेरिकेतील टाम्पा येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी ही धमकी दिली.

  • सिंधू पाणी करारावरून भारताला क्षेपणास्त्र हल्ल्याचा इशारा दिला.

  • ऑपरेशन सिंदूरनंतरचा असीम मुनीर यांचा दुसरा अमेरिकेचा दौरा आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून दारुण पराभव पत्करावा लागलेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. जर भविष्यात भारतासोबत युद्ध झाले आणि पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले तर संपूर्ण प्रदेश अणुयुद्धात अडकेल. मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीवरून अशी पोकळ धमकी दिली आहे. अमेरिकेतील टाम्पा येथे उद्योगपती अदनान असद यांनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये असीम मुनीर बोलत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूरनंतर असीम मुनीर हे दुसऱ्यांदा अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी ऑपरेशन सिंदूरवर जाहिरपणे राग व्यक्त केला. या दौऱ्यादरम्यान मुनीर यांनी सांगितले की, भारत एक चकाकणारी कार आहे, तर पाकिस्तान दगड-विटा घेऊन जाणारा डंपिंग ट्रक आहे. भारतामुळे पाकिस्तानचे अस्तित्व संकटात आले तर पाकिस्तान अर्ध्या जगाला सोबत घेऊन बुडेल. असीम मुनीर यांचे हे विधान म्हणजे भारतासाठी अमेरिकेतून पहिली धमकी आहे.

असीम मुनीर यांनी सिंधू पाणी करार निलंबित करण्याबद्दल भारताला धमकी दिली. त्यांनी भारताला क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकी दिली. असीम मुनीर यांनी सांगितले की, 'आम्ही भारताद्वारे धरण बांधण्याची प्रतीक्षा करू आणि जेव्हा भारत असे करेल मग आम्ही १० क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला करू. सिंधू नदी ही भारताची कौटुंबिक मालमत्ता नाही. आमच्याकडे क्षेपणास्त्रांचा अभाव नाही.'

पाकिस्तान भारताला कसे नुकसान पोहोचवू शकतो हे सांगण्यासाठी मुनीर यांनी एक उदाहरण दिले. ते म्हणाले की, 'मी परिस्थिती समजून सांगण्यासाठी एक साधं उदाहरण देईन. भारत हायवेवर येणारी फेरारीसारखी एक चमकणारी मर्सिडीज आहे, पण आम्ही जंक, वीट-दगडाने भरलेला डंप ट्रक आहोत. जर हा ट्रक त्या कारला धडकला तर नुकसान कुणाचे होईल?'

मुनीर यांनी यावेळी पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्लान बनवला असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, 'आम्ही भारताच्या पूर्वेकडून सुरुवात करू, जिथे त्यांनी त्यांची सर्वात मौल्यवान संसाधने स्थापित केली आहेत आणि नंतर पश्चिमेच्या दिशेने पुढे जाऊ.' फील्ड मार्शल असीम मुनीर यांची प्रतिमा धार्मिकदृष्ट्या कट्टर जनरलची आहे. मुनीर हे पाकिस्तानचे पहिले सैन्य प्रमुख आहेत ज्यांनी मदरसमधून शिक्षण घेतले आहे. आसीम मुनीर बर्‍याचदा त्याच्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ धार्मिक उदाहरणे वापरतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: पुण्यात खाकीवर डाग! २ कोटींची लाच मागितल्याप्रकरणी PSI ताब्यात, गुन्ह्यात मदत करण्यासाठी घेतले पैसे

Maharashtra Live News Update: निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढे जाण्याची शक्यता

Women World Cup Final: हातात तिरंगा आणि पाणावलेले डोळे! एकमेकींना मिठी मारल्यानंतर हरमनप्रीत-स्मृतीला अश्रू अनावर

Rohit Sharma Reaction: रोहितला आठवला 19 नोव्हेंबर? महिलांनी वर्ल्डकप जिंकताच स्टँडमध्ये बसलेला हिटमॅन भावूक; रिएक्शन होतेय Viral

हरमनप्रीत कौरचा जबरदस्त डाव; त्या दोन षटकांत गेम फिरला, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या हातून ट्रॉफी हिसकावली

SCROLL FOR NEXT