Shoaib News Saam
देश विदेश

पाकिस्तानातच ADULT इंडस्ट्री, पॉर्न सर्वाधिक बघणारेही तुम्हीच; MIM नेते शोएब जमईंनी पाकिस्तानला झोडपून काढले

AIMIM leader Shoaib Jamai statement: देशात संतापाची लाट असताना, एआयएमआयएमचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष शोएब जमाई यांनी पाकिस्तानवर तिखट शब्दात टीकास्त्र सोडले आहे.

Bhagyashree Kamble

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. त्यानंतरही पाकिस्तानची कुरघोडी सुरूच होती. भारतानेही या कुरखोड्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. भारतात संतापाची लाट उसळली असताना, एआयएमआयएमचे नेते शोएब जमई यांनी पाकिस्तानवर तिखट शब्दात टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी यासंदर्भात व्हिडिओ शेअर करून पाकिस्तावर टीकेची तोफ डागली. सध्या जमाईंनी पाकिस्तानविरोधात केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरू असून, त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये जमई म्हणाले, 'पाकिस्तान हा सर्वाधिक पॉर्न पाहणारा देश आहे. तुमच्याकडे महिलांचा अपमान केला जातो. तुमच्याकडे भ्रष्टाचाराने कळस गाठलाय. तुमची गरीब राष्ट्रांमध्ये गणना होते, अशी टीका जमई यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी भारतात राहणाऱ्या मुस्लिमांचं कौतुक केलं आहे. "भारतीय मुस्लिम सौदी अरेबिया, मिडल ईस्टमध्ये उच्च पदांवर काम करत आहेत. ते मक्का-मदीनेत भिक मागत नाहीत. भारतातील मुस्लिम इतर देशांमध्येही अभिमानाने जगत आहेत", असं जमई म्हणाले.

मीडिल ईस्टमध्ये सगळे थर्ड क्लास जॉब पाकिस्तानी लोक करत आहे. मी काही काळ अमेरिकेत होतो. मी पाहिलं आहे, पाकिस्तानी लोक अमेरिकेत आपली ओळख लपवून राहतात, असा खुलासाही जमई यांनी केला.

सर्वात मोठी पॉर्न इंडस्ट्री पाकिस्तानात

जमाई यांनी पाकिस्तानवर टीकास्त्र सोडत देशाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या व्हिडिओत म्हटलं की, 'आज पाकिस्तानची ओळख चोर, फसवणूक करणारे आणि फसव्या व्यवसायात सामील असलेल्या लोकांमध्ये झाली आहे. तुमच्या देशात सर्वात मोठी पॉर्न इंडस्ट्री सुरू आहे. तुम्ही जगात सर्वाधिक पॉर्न पाहणाऱ्या देशांपैकी एक आहात. याबद्दल तुम्हाला लाज वाटत नाही का? ', असं जमई म्हणाले.

पाकिस्तानमध्ये सर्वाधिक भ्रष्ट्राचार केला जातो, असा आरोप जमाई यांनी केला आहे. 'तुमच्याकडे (पाकिस्तान) सर्वाधिक भ्रष्ट्रचार आणि अस्वच्छता आहे. तुमच्याकडे महिलांना रात्रभर नाचवलं जातं. तुम्ही नैतिक, सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून पूर्णतः भ्रष्ट झाला आहात.' अशी टीका जमई यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Rosemary Hair Oil Benefits: अंघोळीच्या पाण्यात टाका रोझमेरी तेल, झपाट्याने होईल केसांची वाढ

Pune : एकतर्फी प्रेमातून कांड, राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचा निर्घृण खून, आरोपीला जन्मठेप

Expressway : पुणे ते जळगाव फक्त ३ तासात! नवीन एक्सप्रेस वे नेमका कसा असेल? वाचा

Skin cancer symptoms: त्वचेवर अचानक ही ५ लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध, असू शकतो कॅन्सरचा धोका

SCROLL FOR NEXT