पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू पाणी करार रोखून पाकिस्तानवर एकप्रकारे वॉटर स्ट्राइक केला. तसेच इतरही कठोर निर्णय घेऊन दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचं नाक दाबलं, पण 'नहीं सुधरेंगे' स्वभावाच्या पाकिस्ताननं दुसऱ्याच दिवशी क्षेपणास्त्र चाचणी करण्याची घोषणा केली. त्यावर आता भारतीय यंत्रणांकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे, असे मीडिया रिपोर्ट्स आहेत.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय आहे. यानंतर भारतानं कठोर पावलं उचलत दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचं नाक दाबलं. सिंधू पाणी करार रद्द केला. भारतात असलेल्या पाकिस्तान्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. भारतानं नाक दाबल्यानंतर पाकिस्ताननं तोंड वाजवायला सुरुवात केली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने संरक्षण क्षेत्रातील सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्ताननं २४ -२५ एप्रिलला आपल्या विशेष आर्थिक क्षेत्रातील कराची तटावरा क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची घोषणा केली आहे. तशी अधिसूचना जारी केली आहे. त्यानंतर पाकिस्तानात सुरू असलेल्या प्रत्येक हालचालीवर भारतीय यंत्रणांकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे, असंही सूत्रांनी सांगितलं.
एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारतानं पाकिस्तानच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला समन्स बजावले आहे. त्याचबरोबर सैन्यातील राजनैतिक अधिकाऱ्यांना औपचारिक पर्सोना नॉन ग्रेटा नोट पाठवली आहे. एसव्हीइएस योजनेंतर्गत व्हिसा मिळवणाऱ्यांनाही भारताने मोठा झटका दिला आहे. व्हिसावर भारतात सध्या वास्तव्यास असलेल्या पाकिस्तान्यांना ४८ तासांच्या आत देश सोडावा लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.