Pak-Afghan border forces exchange heavy gunfire near the Chaman–Spin Boldak region, triggering panic among local residents. Saam Tv
देश विदेश

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्षाचा भडका, दोन्ही देशांकडून तुफान गोळीबार

Border Clash Escalates: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढलाय. पाकिस्तानमधील चमन आणि अफगाणिस्तानमधील स्पिन बोल्डक या सीमाभागात दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांमध्ये तुफान गोळीबार झाला. पाकिस्तान आणि अफगाणच्या सीमेवर नेमकं काय सुरू आहे.

Omkar Sonawane

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वादाचा आता पुढचा अंक सुरू झालाय. दोन्ही देशांच्या सीमेवर दोन्ही सैन्यांकडून तुफान गोळीबार करण्यात आलाय. त्यामुळे सीमाभागात तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झालय. यावेळी काही आधुनिक शस्त्रांचा देखील वापर करण्यात आलाय. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये सौदी अरेबिया इथं शांततेबाबत चर्चा सुरू होती. ही चर्चा फिसकटल्यानंतर सीमेवर हा गोळीबार सुरू झाला आहे.

शुक्रवारी रात्री अचानक सुरू झालेल्या या गोळीबारीमुळं सीमाभागात राहणाऱ्या लोकांची तारांबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानमधील स्पिन बोल्डकमधून पाकिस्तानच्या दिशेने फायरिंग झालं तर पाकिस्तानच्या चमनकडून अफगाणिस्तानच्या दिशेला फायरिंग झालं. सतत होणाऱ्या या फायरिंगमुळे दोन्ही देशातील शेकडो कुटुंबे आपला जीव मुठीत घेऊन सुरक्षित स्थान पळू लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिकांना त्यांचं सामान गोळा करण्याची देखील संधी मिळाली नाही.

सध्या सीमेवर अत्यंत तणावपूर्ण स्थिती झालीय. नेहमीप्रमाणे अफगाणिस्ताननं पाकिस्तानला आणि पाकिस्ताननं अफगाणिस्तानला या संघर्षाला जबाबदार धरलंय. अफगाण तालिबानचे प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे पाकिस्तानी सुरक्षा दलांनी कंधारच्या स्पिन बोल्डक जिल्ह्यात पहिल्यांदा हल्ला केला. त्यामुळं इस्लामिक अमिरातच्या सुरक्षा दलांना प्रत्युत्तर देणं भाग पडलं अशी प्रतिक्रिया दिलीय..

दुसरीकडं पाकिस्तान सराकरनं अफगाणिस्तानचे आरोप फेटाळून लावले. पाकिस्तान प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रवक्ते मोशर्फ जैदी यांनी अफगाण सुरक्षा दलांनी सीमेवर येत कारण नसताना गोळीबार केला. त्यांच्या या कृतीनंतर पाकिस्ताननं आपल्या नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली असं म्हंटलंय. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये याआधीही अनेकदा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालंय. मात्र यावेळचा संघर्ष पाहता, दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित होणं गरजेचं आहे. अन्यथा युद्धाची ठिणगी दोन्ही देशांमध्ये आर्थिक संकट तर निर्माण करेलच मात्र याचे परिणाम आसपासच्या देशांनाही भोगावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sofia Ansari: सोफिया अन्सारीचे इन्स्टाग्रामवर १५ मिलियन पूर्ण, बोल्ड फोटोंनी केलं सेलिब्रेशन

Maharashtra Live News Update: मनसेकडे उमेदवारी अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी

Mumbai Local Mega block : मुंबईत मेगाब्लॉक, रेल्वे प्रवाशांचे होणार मेगाहाल; कसं असेल लोकलचं वेळापत्रक?

मंत्री येत नसतील तर बिबटे सोडा, मंत्रिपद न मिळालेल्या सुधीर मुनगंटीवारांचा सभागृहात संताप|VIDEO

Crocodile Mummy Egypt: वैज्ञानिकांनी उघडलं ३००० वर्षांपूर्वीचं मगरीचं ममी; आत दडलेलं रहस्य जगाला थक्क करणारं

SCROLL FOR NEXT