Pahalgam Terrorist Attack Saam tv
देश विदेश

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम हल्ल्यानंतर Thank You Pakistan, Thank You Lashkar-e-Taibaची पोस्ट व्हायरल; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pahalgam Terrorist Attack: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर एकाने एक्सवर "Thank You Pakistan" असे लिहित पोस्ट केली होती.

Bharat Jadhav

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर Thank You Pakistan म्हणणाऱ्या झारखंडमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. मोहम्मद नौशाद, असं या व्यक्तीचं नाव आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर मोहम्मद नौशादने सोशल मीडियाच्या एका साईटवर Thank You Pakistan असं म्हणत पोस्ट केली होती. पहलगाम हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली.

त्याचवेळी झारखंडमधील बोकारो येथील राहणारा मोहम्मद नौशादने हल्ल्याचा आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्याने हल्ल्यासाठी पाकिस्तान आणि लष्कर-ए-तोयबाचे आभार मानले. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मोहम्मद नौशादला अटक केली.

आरोपी हा बलिदीह येथील मिल्लत नगरचा रहिवासी आहे. पोलीस स्टेशनचे प्रभारी नवीन कुमार यांनी नौशादला अटक केल्याची माहिती दिलीय. आम्हाला मोहम्मद नौशाद याच्याविरुद्ध तक्रार मिळाली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आलीय. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती नवीन कुमार कुमार दिली. मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम शहराजवळील पर्यटन स्थळ असलेल्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात २८ जणांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या मोहम्मद नौशादच्या वडिलांचे नाव मोहम्मद मुस्ताक आहे. ते मिल्लत नगरचे रहिवासी असून पोलीस नौशादची चौकशी करत आहेत. पोलीस स्टेशनचे प्रभारी नवीन कुमार म्हणाले- मोहम्मद नौशाद यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सची पोलिस चौकशी केली जात आहे. त्याचबरोबर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती गोळा केली जात आहे.

पोस्टमध्ये काय लिहिले होते?

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आनंद साजरा केला होता. बालिडीह येथील रहिवासी मोहम्मद नौशाद यांनी सोशल मीडियावर पोस्टवर लिहिलं होतं की, 'धन्यवाद पाकिस्तान, धन्यवाद लष्कर-ए-तैयबा'. अल्लाह तुम्हाला दीर्घायुष्य देवो. आमेन, आमेन. जर तुम्ही भाजप, आरएसएस, बजरंग दल आणि माध्यमांना लक्ष्य केले तर आम्हाला जास्त आनंद होईल. आता कुठे गेले आरएसएस, भाजप आणि बजरंग दल? सीमेवर जा आणि उड्या मारून आणि नाचून तुमचे शौर्य दाखवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT