Jammu Kashmir Terror Attack  saam tv
देश विदेश

Pahalgam Terror Attack: गोळीबारात मृत पावलेल्या मंजुनाथचा अखेरचा व्हिडिओ Viral; हल्ल्याच्या आधीच केलं होतं शूट

Jammu Kashmir Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील मंजुनाथ यांचा मृत्यू झालाय. हल्ल्यापूर्वीचा त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Bharat Jadhav

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील मंजुनाथ यांचा मृत्यू झालाय. हल्ल्यापूर्वीचा त्याचा शिकारा राईडचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल होतोय. गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीनगरमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली आणि कडक कारवाईची घोषणा केलीय.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झालाय. बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत, २८ जणांचा मृत्यू झाला होात. हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीचे नावे समोर आली आहेत. यात मंजुनाथ याचेही नाव आहे. ते कर्नाटकचे रहिवासी होते. मंजुनाथचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्यांनी हल्ल्याच्या काही काळापूर्वी श्रीनगरमध्ये शिकारा राईड दरम्यान व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.

व्हिडिओमध्ये, ते त्यांच्या पत्नीसोबत बोटीत बसलेले होते ते दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. प्रवासाच्या अनुभवाचे तसेच ट्रॅव्हल एजन्सी आणि गाईडचे कौतुक करताना दिसत आहेत. दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी एक्स वर लिहिले की, "जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत."

या भयानक दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची माहिती देण्यात आलीय. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली आहे. मी सर्व सुरक्षा एजन्सींसोबत तात्काळ बैठकीसाठी श्रीनगरला जात आहे.

जा, जाऊन मोदींना सांग!

शिवमोगातील पर्यटकाला त्याच्या पत्नीच्या डोळ्यांदेखत दहशतवाद्यांनी ठार केलं. मंजूनाथ हे कर्नाटकातील शिवमोगा येथील रहिवाशी होते. ते जम्मू-काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मंजूनाथ यांचा मृत्यू झाला. मंजूनाथ यांची पत्नी पल्लवी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा थरकाप उडवणारा प्रसंग सांगितलाय.

मी, पती आणि आमचा मुलगा तिघेही काश्मीर फिरायला गेलो होतो. साधारण दुपारचे दीड वाजले असताना एका गटानं गोळ्या झाडायला सुरुवात केली. माझ्या नवरा माझ्या डोळ्यांसमोर मरण पावला. त्यांना आपल्यावर गोळ्या झाडायला लावल्या तेव्हा त्यांनी तुला मारणार नाही. मोदींना जाऊन सांग असं दहशतवादी तिला म्हणते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी

Mrunal-Bipasha: मृणाल बिपाशाच्या वादात हिना खानची एन्ट्री; अभिनेत्री म्हणाली, 'मी अशा चुका केल्या...'

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा, लोकलवरही परिणाम

भारताला धमकावणारे ट्रम्प रशियाच्या पुतिनसमोर शांत; 'पीसमेकर' प्रतिमेला धक्का, भेटीचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT