Jammu Kashmir Terror Attack 
देश विदेश

Pahalgam Terror Attack: भेळपुरी खाताना दहशतवादी आले, नवऱ्याला हटकलं अन्...; महिलेने सांगितली आपबीती

Jammu Kashmir Terror Attack: पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झालाय. स्थानिक लोकांनी जखमींना खेचरांवर बसवून खाली आणले. १२ जण जखमी पर्यटकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Bharat Jadhav

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात असलेल्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केलाय. यात २७ जणांचा मृत्यू झालाय. तर १२ जण जखमी झालेत. यात महाराष्ट्रातील ४ जणांचा समावेश आहे. या हल्ल्याची आपबीती अनेक प्रत्यक्षदर्शी महिलांनी सांगितली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एक महिला रडत-रडत पतीला वाचवण्यासाठी विनवणी करत होती. दहशतवाद्यांनी या महिलेच्या समोरच तिच्या नवऱ्यावर गोळ्या झाडल्या.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला, तो तिने तिच्या डोळ्यावर पाहिला. गोळीबाराचा आवाज, जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ होत होती. हल्ल्याचा थरार पाहून अनेकांचा थरकाप उडला. नवऱ्याला वाचवण्यासाठी महिला विनवण्या करत होती. रडताना तिचा आवाज सु्द्धा निघत नव्हता.

हल्ल्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हिडिओ रेकॉर्ड करणारा व्यक्ती महिलेला समजावण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. हा व्यक्ती परिस्थितीबद्दल अधिक माहिती मिळवत आहे. व्हिडिओमध्ये रक्ताच्या थारोळ्यात दोन पुरुष पडलेले दिसत आहेत. एका महिलेने सांगितलं की, ती भेळपुरी खात होती, त्यावेळी बंदूक घेऊन काही लोक तेथे आले, त्यांनी माझ्या पतीला हटकलं. त्याला नाव विचारलं. नाव सांगताच डोक्यात गोळी घातली.

आणखी एक महिला, जी एका गंभीर जखमी पुरूषाची काळजी घेताना दिसतेय. हताश होऊन ती लोकांकडे मदत मागताना दिसते. "सर, कृपया मदत करा" असं ती महिला म्हणताना दिसत आहे.

पंतप्रधान मोदींचा अमित शहांना फोन

दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला. त्यांनी फोनवरून शहांना सुचना दिल्या आहेत. या प्रकरणात ठोस आणि कठोर कारवाई करण्यास आदेश त्यांनी दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT