Lieutenant Vinay Narwal Wife Himanshi Swami 
देश विदेश

Pahalgam Attack: 'जय हिंद, आम्हाला तुमचा अभिमान...; विनय नरवालच्या पार्थिवाला अलिंगन, लेफ्टनंटला पत्नीचा अखेरचा सॅल्यूट

Lieutenant Vinay Narwal Wife Himanshi Swami: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांना त्यांच्या पत्नी हिमांशी स्वामी यांनी भावनिक निरोप दिला. रडत-रडत हिमांशीने पतीचं दर्शन घेतलं आणि "जय हिंद" म्हटलं.

Bharat Jadhav

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे अख्खा देश हादरून गेला. दहशतवाद्याच्या हल्ल्यात भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल शहीद झाले. आज त्यांच्या पार्थिववर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नीने अखेरचा निरोप दिला.

तिरंग्यातील पतीचं पार्थिव पाहून पत्नी हिमांशी स्वामीच्या डोळ्यातील पाणी थांबता थांबत नव्हते. आपल्या पतीबद्दल बोलाताना हुंदका भरून येत होता. हुंदका भरत भरत तिने पतीला सॅलूट करत 'आम्हाला तुझा अभिमान राहिलं' असं म्हटलं आणि पार्थिवला आलिंगन देत ढसाढसा रडू लागली.

लग्नाच्या सहा दिवसानंतर हनिमूनसाठी गेलेल्या लेफ्टनंट विनय नरवाल यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. त्यावेळी पत्नी हिमांशू स्वामी संपूर्ण दिवस आपल्या पतीच्या मृतदेहाशेजारी बसून होत्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीला पाहून तिच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडला नव्हता ना तिच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. जसं की तिचे प्राण गेले असावे. तिने सर्व संवेदना हरवली असावी.

Pahalgam Attack

आज तिरंग्यात पतीचं पार्थिव पाहिल्यानंतर हिमांशीने मोठा टाहो फोडला. पत्नीचा आक्रोश पाहून देशातील अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. लेफ्टनंट विनय नरवाल हे त्यांच्या पत्नीसोबत हनिमून साजरा करण्यासाठी पहलगामला गेले होते. १६ एप्रिल रोजी त्याचे लग्न झाले होतं. दरम्यान, मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला आणि त्याला दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. या घटनेनंतर, विनय नरवाल यांच्या मृतदेहाजवळ बसलेल्या त्यांच्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

नौदलातील लेफ्टनंट विनय नरवाल (२६) हे मूळचे हरियाणाचे रहिवासी होते. सध्या ते केरळमधील कोची येथे तैनात होते. त्यांनी लग्नासाठी सुट्टी घेतली होती आणि नंतर त्याची पत्नी हिमांशी स्वामीसोबत हनिमून साजरा करण्यासाठी काश्मीरला गेले होते. मंगळवारी हिमांशीसमोर दहशतवाद्यांनी तिच्या पतीवर गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हापासून त्यांची पत्नी हिमांशी स्वामी सतत रडत असल्याने त्यांची प्रकृती खराब झालीय. बुधवारी विनय याचे पार्थिव हरियाणातील कर्नाल येथील गावी पोहोचले. तेथे हिमांशीने तिच्या पतीला शेवटचा सलाम केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर, ओढ्याला पूर आल्यामुळे पिंगळी लिमला रस्त्यावरची वाहतूक बंद

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT