Pahalgam Attack Truth Saam Tv
देश विदेश

Pahalgam Attack Truth: पहलगाम हल्ल्यामागे कुणाचा हात? पाकिस्तानच्या जवानानेच केला पर्दाफाश

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामुळे भारताला मोठा हादरला बसला. या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे? असे अनेक प्रश्न सर्व भारतीयांना पडले आहेत. अशामध्ये पाकस्तानच्या जवानानेच या हल्ल्यामागचा पर्दाफाश केला आहे.

Priya More

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २८ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या हल्ल्याचा कट कोणी रचला होता? दहशतवादी कोणी पाठवले होते? दहशतवाद्यांना कोणी मदत केली? पैसे कोणी दिले? शस्त्रे कोणी दिली? असे अनेक प्रश्न सर्व भारतीयांना पडले आहेत. आता या कटावरील पडदा पाकिस्तानी लष्कारात असलेल्या एका सैनिकानेच उचलला आहे.

पाकिस्तानी लष्कराचे माजी सैनिक आदिल राजा यांनी एक खळबळजनक खुलासा केला असून त्यामुळे आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्यांनी दावा केला की, 'पहलगाम हल्ला पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या आदेशावरून झाला.' त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा पर्दाफाश झाला आहे.

आदिल राजा यांनी गुप्तचर सूत्रांचा हवाला देत हा दावा केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, 'पहलगाम हल्ला जनरल असीम मुनीर यांच्या आदेशावरून झाला. मुनीरने जाणूनबुजून हा हल्ला केला जेणेकरून त्याच्याविरुद्ध प्रलंबित असलेले खटले दाबले जातील. एका खुर्चीसाठी पहलगाममध्ये निष्पापांचे रक्त सांडले गेले.' आदिल राजा यांच्या म्हणण्यानुसार, 'मुनीरने प्रथम परदेशी पाकिस्तानींना बोलावून प्रक्षोभक विधाने केली आणि नंतर हा हल्ला केला.'

आदिल राजा यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, 'मी ही पोस्ट लिहित असताना लोक मला भारतीयांचा एजंट म्हणतील, पण सत्य हे आहे की पहलगाम हल्ला मुनीरच्या आदेशावरून झाला. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे ऑफ द रेकॉर्ड सांगितले आहे.' आदिल राजा यांच्या या दाव्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण तज्ज्ञ यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. निवृत्त मेजर जनरल हैदर खान म्हणाले की, 'जर हे खरे असेल तर ते पाकिस्तानसाठी लज्जास्पद आहे. असीम मुनीरच्या या कृतीमुळे केवळ पाकिस्तानची प्रतिमा मलिन होत नाही तर प्रादेशिक शांतताही धोक्यात येत आहे.'

पाकिस्तानी पत्रकार रुमान हाश्मी म्हणाले, 'मुनीरच्या चुकीचे परिणाम संपूर्ण पाकिस्तानला भोगावे लागतील. हा हल्ला कदाचित त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी केलेला कट असेल, परंतु त्यामुळे जागतिक स्तरावर पाकिस्तान आणखी एकाकी पडला.' एका युजरने लिहिले की, 'असीम मुनीरने हिंदूंविरुद्ध द्वेष निर्माण केला आणि आता त्याचे परिणाम पहलगाममध्ये रक्तपात झाला आहे. मुनीरला ताबडतोब काढून टाकावे, अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होईल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहेत रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT