BSF Jawan Crossed Border : एकीकडे भारत-पाकिस्तान तणाव, दुसरीकडे BSFच्या जवानाने चुकून उलांडली झिरो लाईन; Pakच्या रेंजर्सनी पकडलं

Firozpur BSF Jawan Crossed the Border : फिरोजपूरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेला BSF (Border Security Force)चा एक जवान चुकून झिरो लाईन ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेला आहे.
BSF Jawan Crossed Border
BSF Jawan Crossed Border Saam TV News
Published On

चंदीगड : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश सुन्न झालेला आहे. येथे आलेल्या तब्बल २८ पर्यटकांना दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार करत ठाक केलंय. त्यात महाराष्ट्रातील पाच जणंचा समावेश आहे. या घटनेला अवघे दोन दिवस झाले असून त्यातच आता पंजाबमधून एक महत्त्वाची बातमी आहे. फिरोजपूरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेला बीएसएफचा एक जवान चुकून झिरो लाईन ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेला आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी त्याला पकडलं आहे.

बीएसएफ जवान त्या ठिकाणी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर लक्ष ठेवून होता. या जागेवर शेतकऱ्यांना शेती करायला स्पेशल परवानगी लागते. जेव्हा शेतकरी पेरणी करतात किंवा कापणी करतात, तेव्हा बीएसएफ जवान त्यांच्या सुरक्षेसाठी सोबत असतात. त्यांना किसान गार्ड असेही म्हणतात. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील वातावरण तणावपूर्ण आहे. जवान चुकून बॉर्डर पार करून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याने सरकार चिंतेत आहे. बीएसएफने याबद्दल अजून कोणतीही ऑफिशियल माहिती दिलेली नाही, पण फ्लॅग मीटिंग चालू आहे. लवकरच यावर तोडगा निघेल आणि जवान परत येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

BSF Jawan Crossed Border
Naresh Mhaske : 'जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानातून परत आणतोय'; खासदार नरेश म्हस्केंचं वादग्रस्त भाष्य

पाकिस्तानी रेंजर्स आणि बीएसएफ अधिकाऱ्यांची बैठक झाली. श्रीनगरमधून बीएसएफची बटालियन-२४ ममदोटमध्ये आली आहे. काल बुधवारी सकाळी शेतकरी त्यांच्या कंबाइन मशीनने गहू कापायला शेतात गेले होते. ते शेत फेंसिंगवर असलेल्या गेट नंबर-२०८/१च्या जवळ होते. शेतकऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी दोन BSF जवान त्यांच्यासोबत होते. त्याचवेळी एक जवान चुकून बॉर्डर पार गेला.

तेव्हा पाकिस्तानी रेंजर्स बीएसएफच्या जल्लोके चेक पोस्टवर आले. त्यांनी बीएसएफ जवानाला पकडले आणि त्याचे शस्त्र सुद्धा घेतले. ही बातमी मिळताच बीएसएफचे मोठे अधिकारी बॉर्डरवर पोहोचले. जवानाला सोडवण्यासाठी पाकिस्तानी रेंजर्स आणि बीएसएफ अधिकाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत मीटिंग चालू होती. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम हिल स्टेशनवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर २० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. बीएसएफ जवानाला सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत.

BSF Jawan Crossed Border
Sanjay Lele Family Pahalgam attack : माझ्या बाबांचं डोकं रक्ताने माखलेलं, संजय लेलेंच्या मुलाने सांगितली हादरवणारी कहाणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com