Indian Navy Firing Anti Ship Missile Saam Tv
देश विदेश

Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यास भारत सज्ज, पहिलं लक्ष्य कराचीच; नौदलाने दाखवला युद्धाचा ट्रेलर| VIDEO

Indian Navy Firing Anti Ship Missile: पहलगाम हल्ल्यामुळे भारताला मोठा हादरला बसला. या हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताकडून अनेक ठोस पाऊलं उचलली जात आहेत.

Priya More

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने भारताला मोठा धक्का बसला. या हल्ल्यात २८ पर्यटकांनी आपला जीव गमावला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या खुरापती सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरच्या काही भागांमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सीमेवर परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू आहे. पण आता भारत पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी भारत पाकिस्तानला फक्त एका बाजूने नाही तर सर्व बाजूंनी घेरण्याची तयारी करत आहे.

रविवार २७ एप्रिल रोजी भारतीय नौदलाने त्यांच्या युद्धनौकावरून अँटी शिप मिसाइलची यशस्वीरित्या चाचणी केली. लष्कराच्या युद्धनौकावरून लाँग रेंज ब्रह्मोस मिसाइलची चाचणी घेण्यात आली. ब्रह्मोस लॉन्ग रेंज अँटी-शिप मिसाइलची मारा क्षमता ८०० किलोमीटरपर्यंत आहे. जर भारताने हल्ला केला तर पाकिस्तानचा आर्थिक कणा असलेल्या कराचीसह अनेक शहरे उद्ध्वस्त होऊ शकतात.

रविवारी भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल एक्सवर नौदलाच्या या अँटी-शिपच्या यशस्वी चाचणीची माहिती दिली. आज अरबी समुद्रातील नौदलाच्या जहाजावरून ब्रह्मोस लॉंग रेंज अँटी-शिप मिसाइलची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचणीत, नौदलाने आपल्या युद्धनौकांमधून अनेक लक्ष्यांवर अचूक हल्ले केले जे नौदलाच्या ताकदीचे आणि तयारीचे उत्तम प्रदर्शन दाखवत होते. या चाचणीमुळे नौदलाची शस्त्रे, युद्धनौका आणि कर्मचाऱ्यांची लांबपर्यंत अचूक प्रहार करण्याची क्षमता पुन्हा सिद्ध होत आहे.

भारत आणि रशिया यांच्या भागीदारीत विकसित केलेले ब्रह्मोस क्षेपणास्त्र जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. ते ९०० किलोमीटर अंतरावरील शत्रूच्या जहाजांना आणि तळांना लक्ष्य करू शकते. नौदलाने असे सांगितले की, 'आपले नौदल नेहमीच सर्वत्र आणि कोणत्याही परिस्थितीत देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यास सज्ज आहे.' ही यशस्वी चाचणी म्हणजे स्वावलंबी भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT