Two Youths Arrested in Amritsar for Spying Saam tv
देश विदेश

Pakistan: मोठी बातमी! अमृतसरमधून हेरगिरी करणाऱ्या २ तरुणांना अटक; मोबाइलद्वारे ISI ला पोहचवत होते माहिती

Two Youths Arrested in Amritsar for Spying: हेरगिरी प्रकरणी पंजाबच्या अमृतसरमध्ये लष्कराने मोठी कारवाई केली आहे. अमृतसरमधून दोन पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक करण्यात आली आहे. ते मोबाइलद्वारे ISI ला माहिती पोहचवत होते.

Priya More

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार आणि भारतीय लष्कर अॅक्शन मोडमध्ये आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. भारत कधीही हल्ला करेल यामुळे पाकिस्तान देखील घाबरला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले. पाकिस्तानी नागरिकांना भारतामधून परत पाठवण्यात आले. आता देशामध्ये असलेल्या पाकिस्तानी हेरांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राजस्थाननंतर आता पंजाबमध्ये लष्कराला मोठे यश मिळाले आहे. अमृतसरमधून दोन पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानला गुप्तचर माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अमृतसहमधील अजनाला पोलिसांनी दोन पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक केली आहे. जिंदर मसिह यांचा मुलगा फलकशेर मसिह आणि बलारवाल गावातील जुग्गा मसिह यांचा मुलगा सूरज मसिह या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. या दोन्ही गुप्तहेरांचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी असलेले संबंध उघड झाले आहेत.

जवानांनी अटक केलेले हेर अमृतसर आर्मी कॅन्ट आणि अमृतसर एअरबेसशी संबंधित माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याची माहिती प्राथमिक तपासातून उघड झाली आहे. त्यांनी पाकिस्तानशी अनेक वेळा झालेल्या संभाषणांची माहिती देखील मिळाली आहे. सध्या लष्कराने आपली कारवाई सुरू केली आहे आणि हेरांकडून सर्व गुपिते बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अटक केलेल्या आरोपींनी अमृतसरच्या अनेक भागांचे फोटोही पाकिस्तानला पाठवले असल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. या दोघांविरोधात कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात पुढे अनेक मोठे खुलासे होऊ शकतात.

दरम्यान, एक दिवस आधी राजस्थानमधून एका गुप्तहेराला अटक करण्यात आली. पोलिस गुप्तचर शाखेने पकडलेल्या पाकिस्तानी गुप्तहेराची ओळख ४० वर्षीय पठाण खान अशी झाली आहे. तो जैसलमेरमधील झिरो आरडी मोहनगडचा रहिवासी आहे. तो बराच काळ पाकिस्तानी गुप्तहेरांना लष्करी क्षेत्राचे व्हिडिओ आणि फोटो पाठवत होता. याशिवाय एका पाकिस्तानी रेंजरलाही भारतीय लष्कराने ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भापतीय लष्कर सातत्याने कारवाई करत आहे. यासोबतच अनेकांना अटक करण्यात आली आहे आणि अनेकांची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT