Pahalgam Terrorist Attack  saam tv
देश विदेश

Pahalgam Attack Inside Plot: कोड नेम, हेल्मेट, व्हिडिओग्राफी, २० मिनिटं बेछूट गोळीबार;पहलगाम हल्ल्यामागच्या कटाची इनसाइड स्टोरी

Pahalgam Terrorist Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले दोन स्थानिक दहशतवादी बिजभेरा आणि त्राल येथील आहेत.

Bharat Jadhav

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. हल्ला घडवणाऱ्या चारही दहशतवाद्यांचा फ सुरक्षा एजन्सीकडून जारी करण्यात आलाय. पहलगाममध्ये पर्यटकांना टार्गेट केल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरलीय. दोषींना कडक शिक्षा करावी, अशी मागणी केली जातेय. दरम्यान पहलगामचा हल्ला कसा घडवला गेला घटनेवेळी काय घडलं याची इनसाईड स्टोरी समोर आलीय.

हल्ला करणारे दहशतवादी एकमेकांना कोड नावाने हाक मारत होते. त्यांना काही स्थानिक दहशतवाद्यांनी मदत केलीची बाब समोर आलीय. दहशतवाद्यांची अधिक माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, एकूण ४ पैकी २ पाकिस्तानी आणि २ स्थानिक होते. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछुटपणे २० मिनिटे गोळीबार केला. यात २८ जणांचा जीव गेला. हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी मूसा, युनूस आणि आसिफ अशी नावे वापरली होती.

सुरक्षा यंत्रणेकडून संशयितांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यांची ओळख पटली असून त्यांची नावे आसिफ शेख, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी आहेत. हे सर्वजण लष्कर-ए-तैयबाच्या संलग्न असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) चे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जात आहे. अधिकाऱ्यांच्या मते, हे तिघेही पूर्वी पुंछमध्ये सक्रिय होते. या प्रदेशात दहशतवादी हल्ले घडवण्यात त्याचा सहभाग होता.

दहशतवाद्यांनी कोड नावं वापरणं हे नवीन नाहीये. परंतु सुरक्षा तज्ज्ञांचे मते, तपासात गोंधळ निर्माण करण्यासाठी, शोधकार्याला वेगळी दिशा देण्यासाठी तसेच दहशतवादी नेटवर्कमध्ये परस्पर बदलण्यायोग्य ओळख स्थापित करण्याच्या प्रयत्न आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्यातील वाचलेल्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तिन्ही संशयितांचे रेखाचित्रे काढण्यात आली आहेत. ते सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

दरम्यान घटनास्थळावरील एक फोटो व्हायरल होत आहे, त्यात एक दहशतवादी AK-47 घेऊन धावत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या वर्णनांशी या दहशतवाद्याचा फोटो मिळता जुळता आहे.

मंगळवारी दुपारी १:३० वाजता पहलगामजवळील बैसरन जंगलात हा हल्ला झाला. प्रथमदर्शींनी सांगितलेलं की, दहशतवादी भारतीय सैन्याच्या पोशाखात आले होते. दहशतवाद्यांनी गोळीबार करण्याआधी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला, त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने पुष्टी केली की "सध्या शोध मोहीम सुरू आहे. हल्लेखोरांना शोधण्याचे सर्व प्रयत्न केली जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT