देश विदेश

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, अभिनेते धर्मेंद्र यांना पद्मविभूषण; १३१ जण पद्म पुरस्काराने सन्मानित,वाचा संपूर्ण यादी

Padma Awards 2026 Full List: पद्मविभूषण पुरस्कारासाठी पाच व्यक्तिमत्त्वांची नावे निवडण्यात आली आहेत. तर पद्मभूषण पुरस्कारासाठी १३ सेलिब्रिटींची निवड करण्यात आलीय. पद्मश्री पुरस्कारासाठी ११३ जणांची निवड करण्यात आलीय.

Bharat Jadhav

दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह पाच व्यक्तिमत्त्वांची पद्मविभूषणसाठी निवड करण्यात आली आहे. यावर्षी एकूण १३१ व्यक्तिमत्त्वांना सन्मानित केले जाणार आहे. त्यापैकी १३ जणांना पद्मभूषण आणि ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला जाईल.

padmaawards2026.pdf
Preview

पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. हे तीन श्रेणींमध्ये दिले जातात. यात पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्म श्री चा समावेश आहे. हे पुरस्कार कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासह विविध क्षेत्रांमध्ये/उपक्रमांमध्ये दिले जातात.

कोणाला कोणता आणि कधी पुरस्कार मिळतो?

पद्म विभूषण : चांगली आणि विशेष सेवा देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.

पद्म भूषण: चांगल्या कामासाठी

पद्मश्री : कोणत्याही क्षेत्रातील विशेष सेवेसाठी ते दिले जाते.

सन्मानितांमध्ये सहा परदेशी लोकांचा समावेश

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर केले जातात. हे पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींकडून दरवर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात प्रदान केले जातात. २०२६ सालासाठी एकूण १३१ जणांना पद्म पुरस्कार दिले जाणार आहेत. या यादीत ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये १९ महिला आहेत. या यादीमध्ये परदेशी/एनआरआय/पीआयओ/ओसीआय श्रेणीतील ६ जण आणि मरणोत्तर १६ जणांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू, सहर शेखच्या समर्थनार्थ जलील मैदानात

वंदे मातरम् , कृषी, देशभक्ती, लोकशाही; प्रजाकसत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती मुर्मू यांनी भारतीयांना काय संदेश दिला? VIDEO

Maharashtra Live News Update: पालघरमध्ये बिबट्या वाडीतील तारेच्या कुंपणात अडकला

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा|VIDEO

Republic Day 2026 Wishes: WhatsApp वर शेअर करा देशभक्तीने भरलेले मराठी, हिंदी आणि English संदेश एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT