लखनऊ: पुढच्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होत आहे. या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी आत्ताच कंबर कसली असून सभा, भाषणे आणि आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमआयएम हा पक्षदेखील पुर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यासाठी एमआयएमआयएमचे पक्षप्रमुख खासदार असादुद्दीन ओवैसी हे तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर होते. यावेळी भाजप आमदार हरी भूषण ठाकूर यांनी औवैसींवर सडकून टीका केली आहे. ("Owaisi's agenda is religious, he wants to be another Jinnah and ..." - BJP MLA claims)
हे देखील पहा -
काय म्हणाले भाजप आमदार हरी भूषण ठाकूर?
भाजपा आमदार हरी भूषण ठाकूर यांनी पाटण्यामध्ये बोलताना ओवैसींवर टीका केली की, “असादुद्दीन ओवैसींचा अजेंडा हा धार्मिक आहे. त्यांना देशातील दुसरा जिन्ना व्हायचंय. त्यांचा फक्त एकच अजेंडा आहे, तो म्हणजे जगाचं तालिबानीकरण आणि इस्लामीकरण करणं,” असं म्हणत ठाकूर यांनी ओवैसींवर निशाणा साधला आहे.
देशात २०२२ मध्ये उत्तर प्रदेशसह आणखी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात गोवा,पंजाब, उत्तराखंड आणि आणि मनीपुर या राज्यांचा समावेश आहे. ओवैसींचा पक्ष हा एकुण १०० जागा उत्तर प्रदेशात लढवणार आहे. मुस्लीम आणि इतर अल्पसंख्यांकांची मते जास्तीत जास्त मिळवण्यासाठी ओवैसी प्रयत्न करणार आहे. या निवडणुकांना काही महिनेच शिल्लक असताना सर्वच पक्ष निवडणकींच्या तयारीला लागले आहेत.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.