Crime News Saam tv
देश विदेश

Crime News : जामीनावर तुरुंगातून बाहेर आला अन् महिलेचा बलात्कार करून घेतला जीव!

Odisha Crime News: जामिनावर सुटलेल्या खुनाच्या आरोपीने ओडिशात एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे.

Satish Kengar

हत्येच्या आरोपातील आरोपी जामीनावर बाहेर आला. त्याने विधवा महिलेचा बलात्कार करुन जीव घेतल्याची धक्कादायक घटना ओडिशामध्ये घडली आहे. रमेश, असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

जामीनावर बाहेर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी बलात्कार आणि हत्येच्या आरोपाखाली अटक केली. ओडिशामधील सुंदरगडमध्ये ही घटना घडली आहे. रमेश नाईक असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ३९ वर्षीय विधवा महिलेचा बलात्कार आणि खून केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने एका व्यक्तीला गंभीर जखमी करून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला होता.

३२ वर्षीय रमेश हा हत्येच्या आरोपाखाली सहा वर्षांपासून तुरुंगात होता. त्याला नुकताच जामीन मिळाला होता. सहा वर्षांपूर्वी महिलेच्या हत्येप्रकरणी रमेश याला तुरुंगवास झाला होता. त्याला पहिल्यांदाच जामीन मिळाला, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने ३९ वर्षीय महिलेचा बलात्कार करुन खून केला.

महिलेवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर दुसऱ्या पुरुषाला मारण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. याप्रकरणाचा आम्ही अधिक तपास करत आहोत, अशी माहिती लाहुनीपाडा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक बेहरा यांनी सांगितले.

8 ऑक्टोबर रोजी विधवेचा मृतदेह कुटुंबातील सदस्यांना एका निर्जन ठिकाणी आढळून आला. त्या महिलेच्या डोक्यावर खोल गंभीर जखमा होत्या. महिलेच्या मेहुण्याने याप्रकरणी लहुनीपाडा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याप्रकरणी खूनाच्या आरोपातून जामीनावर सुटलेल्या ३२ वर्षीय याला ताब्यात घेतलेय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश त्या व्यक्तीवर नाराज होता ज्याने त्याला जामीन मिळवून देण्याचा शब्द दिला होता, मात्र त्याने तसं केलं नाही. तुरुंगातून सुटल्यावर त्याचा बदला घ्यायचा होता. पुढे रमेशला समजले की, त्या व्यक्तीचे विधवा महिलेशी मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्यानुसार त्याने दोघांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला.

त्याने आधी दोघांना एका रेस्टॉरंटमध्ये बोलावले आणि जेवण करून तिघेही त्या व्यक्तीच्या घरी गेले, तिथे रमेशने त्याच्यावर आणि महिलेवर हल्ला केला. त्याच्या मित्राचा मृत्यू झाल्याचं समजून रमेश घरातून निघून गेला आणि जखमी महिलेला एका बांधकाम सुरू असलेल्या घरात घेऊन गेला, जिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. तपासादरम्यान पोलिसांना कळले की, गंभीर जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या चौकशीत रमेशचा या घटनेत सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोध सुरु करून त्याला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Hawk Eye: ऑपरेशन हॉक आय'द्वारे ISISचे 70 अड्डे उद्ध्वस्त, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत ४५.१४ टक्के मतदान

Maharashtra Land Satbara: सामूहिक सातबारा उताऱ्यातून स्वतंत्र उतारा कसा काढायचा? कसा कराल अर्ज?

Success Story : जव्हारमधील शेतकऱ्याची गगन भरारी! दोन एकर शेतीतून तरुण बनला लखपती

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी हॉटेलस्टाईल कुरकुरीत जलेबी बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT