Cm Nitish Kumar Saam Tv
देश विदेश

लोकसभा निवडणुकांवरुन नितीश कुमार यांचं मोठं विधान; म्हणाले, 'विरोधी पक्षांना...'

बिहारमध्ये झालेल्या सत्ताबदलानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: बिहारमध्ये (Bihar) झालेल्या सत्ताबदलानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आता २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांवरुन (Election) वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. आपण आता देशातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे काम करणार असल्याचे विधान नितीश कुमार यांनी केले आहे. या विधानानंतर आता देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जे ईडी आणि सीबीआयचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहेत, त्यांना जनता चांगलाच धडा शिकवणार आहे, असंही नितीश कुमार (Nitish Kumar) म्हणाले.

आतापर्यंत देशातील अनेक नेत्यांनी मला या संदर्भात फोन केले आहेत. मला वाटते देशातील सर्व विरोधकांनी आता एकत्र आले पाहिजे, असंही ते म्हणाले. बिहारमध्ये भाजपसोबत युती तोडून नितीश कुमार यांनी आरजेडी आणि काँग्रेससोबत जात सरकार स्थापन केले आहे.

विधानसबेत जेव्हा आमचे आमदार कमी झाले होते, तेव्हा आम्ही मुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिला होता. पण भाजपचे ऐकून आम्ही ते मान्य केले. आणि मुख्यमंत्री पद घेतले. पण हळूहळू परिस्थिती अशी आली की, आमच्यासोबत असणाऱ्या सर्व आमदारांनी एनडीएतून बाहेर पडण्याची इच्छा बोलून दाखवली, असा दावाही मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी केला आहे.

आम्ही भाजपला धोखा दिलेला नाही. आमच्या आमदारांचे मत होते बाहेर पडायचे, म्हणून आम्ही बाहेर पडलो आहे. देशाची परिस्थीती सध्या वाईट आहे. आरसीपी सिंह यांच्या संदर्भात बोलताना नितीश कुमार म्हणाले, त्यांनी काही चांगले केले नाही. आम्ही आरसीपी सिंह यांना अनेक अधिकार दिले होते. त्यांनी पक्षाच्या हिताचे काम केले नाही. मोठी गडबड केली आहे. ते फक्त माझ्यावरच बोलत असतात. आम्ही त्यांचा चांगला सन्मान केला आहे. पक्षाचे अध्यक्षपदही त्यांना दिले होते. यानंतर ते केंद्रीय मंत्री झाले. यानंतरच त्यांना आम्ही पक्षाचे अध्यक्षपद सोडायला सांगितले, असंही नितीश कुमार (Nitish Kumar) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तेरी गाड़ी को हम ब्लास्ट करेंगे! सनातन संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना बॉम्बने उडवण्याची धमकी

शरद पवारांना पत्र लिहिणारा अकोल्यातील तरूण समोर.. तो म्हणतो, साहेबच माझं लग्न करून देतील|VIDEO

Bigg Boss 19: मृदुल तिवारीला बाहेर काढण्यासाठी रचला कट; बिग बॉस १९ मध्ये प्रेक्षक म्हणून प्रवेश आलेल्या व्यक्तीचा दावा

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; ५०० ठिकाणी छापे अन् ६०० जणांना ताब्यात घेतलं

Girja Oak Husband: रातोरात स्टार झालेल्या गिरीजा ओकचा नवरा कोण आहे? काय करतो?

SCROLL FOR NEXT