Rahul Gandhi  Saam Tv
देश विदेश

Oppositions Phone Hack: कितीही फोन टॅप करा, मला फरक पडत नाही, माझाही फोन घ्या; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi : विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन हॅक करण्यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय.

Bharat Jadhav

Rahul Gandhi On Opposition Phone Hack:

विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन हॅक होण्याच्या प्रकारामुळे देशातील राजकारण तापलंय. याप्रकरणावरुन विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका केली जातेय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या प्रकरणावरुन सरकारवर हल्लाबोल केलाय. पंतप्रधान मोदींचा आत्मा गौतम अदानी असल्याची टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केलीय.

देशातील विरोधी पक्षातील नेत्यांना Apple कंपनीने अलर्ट मेसेज पाठवलाय. ३१ ऑक्टोबर रोजी देशातील काही नेत्यांना अलर्ट मेसेज पाठवण्यात आलाय. 'स्टेट स्पॉन्सर्ड अटॅकर्स' द्वारे काहींना टार्गेट केलं जाऊ शकतं, असा संदेश या मोबाईल कंपनीने पाठवलाय. या प्रकरणावरुन काँग्रेस खासदाराने आरोप केलाय की, भाजप तरुणांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजा हा राजा नाही, त्याच्या हातात ताकद राहिली नाहीये. आम्ही जेव्हा अदानी यांच्यावर टीका करतो, तेव्हा आमच्यावर धाडी टाकण्यासाठी गुप्तचर यंत्रणा, गृप्तहेर, सीबीआयला सोडलं जातं. आता अदानी एक नंबर आहे तर दोन नंबरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि तिसऱ्या नंबरवर अमित शाह असल्याची टीका राहुल गांधींनी केंद्र सरकारवर केलीय.

राहुल गांधींनी अॅपल कंपनीकडून आलेल्या ईमेलची प्रिंट केलेली कॉपी पत्रकार परिषदेत दाखवली. संपूर्ण विरोधी पक्षाला अॅपलकडून एक मेसेज आलाय. आमच्या कार्यालयातील अनेक नेत्यांना हा मेसेज आलाय. सर्वजण कोण-कोणत्या प्रकणात समाविष्ट आहेत. हे तुमचं लक्ष विचलित करतात. तुमच्या मनात राग आणतात.

जेव्हा तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो, तेव्हा हे लोक देशातील पैसा घेऊन पसार होत असतात. वेणुगोपाल, पवन खेरा, सीताराम येचुरी, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे, प्रियंका चतुर्वेदी, महुआ मोइत्रा, राघव चढ्ढा, अखिलेश यादव, या सर्वांना अॅपलकडून मेसेज आलीय. या सर्वांनी गौतम अदानीविरोधात आवाज उठवलाय. संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर अदानी ग्रुपला दिलीय. परंतु कितीही टॅपिंग करा, मला फरक पडत नाही, असा आरोप राहुल गांधींनी केलाय.

टीएमसी नेत्या महुआ मोइत्रा, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेस नेते शशी थरूर, आणि पवन खेरा,यांनी सांगितलं की, त्यांना फोन निर्माण करणाऱ्या कंपनीकडून इेशारा देणारा मेसेज आला. अॅपल आयडीद्वारे जोडलेल्या आयफोन्सना स्टेट स्पॉन्सर्ड अटॅकर्सद्वारे नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा आणि एमआयएम खासदार असदुद्दीन औवेसी यांनाही असा मेसेज आलाय.

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही सरकारवर हल्लाबोल केलाय. ही दु:खाची गोष्ट आहे. फोन निर्मात्या कंपनीकडून सकाळी मेसेज आला. या मेसेजमध्ये स्टेटकडून तुमचा फोन हॅक केला जात आहे. लोकशाहीत स्वतंत्र संपवलं जात असल्याने ही दु: खाची गोष्ट आहे. ही हेरगिरी कशासाठी केली जात आहे. याचा तपास केला गेला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

SCROLL FOR NEXT