पहलगाम हल्ल्याचा बदला भारतानं घेतलाय. २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला केला होता. त्याचा बदला घेत भारताच्या तिन्ही दलांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या बालेकिल्ल्यांवर हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. पाकिस्तानमधील ९ ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
हवाई दलाच्या फायटर जेट्सने पाकिस्तानमधील चार आणि पीओकेमधील पाच दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राइक करून ते उद्ध्वस्त केले. या मोहिमेत भारतीय हवाई दल, नौदल आणि लष्करानं महत्वाची भूमिका बजावलीच, शिवाय भारतीय गुप्तचर यंत्रणेनेही मोठी मदत केल्याचे मीडिया रिपोर्ट्स आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, नौदल, लष्कर आणि हवाई दलांना भारतीय गुप्तचर यंत्रणा 'रॉ'ने सीक्रेट डिटेल्स दिली होती.
एअर स्ट्राइकसाठी ही ९ ठिकाणं कुणी निवडली?
हवाई हल्ल्यासाठी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचे अड्डे रॉ या संस्थेने निवडले होते, अशी माहिती समजते. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. दहशतवाद्यांच्या या तळांवर पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्या अधिकाऱ्यांची नेहमीच ये-जा असते.
पाकिस्तानमधील बहावलपूर आणि मुरीदके हे दहशतवादी तळ निशाण्यावर होते. बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे मुख्य तळ होते. तर लाहोरचे मुरीदके हे लश्कर ए तोयबाचे तळ होते. भारतानं एअर स्ट्राइक करताना कुठल्याही सैन्याच्या ठिकाणाला टार्गेट केलेले नाही. तर नागरिकांनाही कोणताही धोका पोहोचलेला नाही. दहशतवादी गटांचे तळ हेच हवाई दलाच्या निशाण्यावर होते.
पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत भारतानं पाकिस्तानात हवाई हल्ले केले. तेथील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. मरकज सुभान अल्लाह, बहावलपूर, पाकिस्तान, जैश ए मोहम्मदचे मुख्यालय यांना टार्गेट करण्यात आले.
२५ मिनिटांत करेक्ट कार्यक्रम
भारतानं हवाई हल्ला करताना पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांचे लाँचपॅड आणि ट्रेनिंग सेंटर्सना टार्गेट केले. पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणं निवडली गेली. सवाई नाला मुजफ्फराबादमध्ये लश्करचे ट्रेनिंग सेंटर होते. सोनमर्ग, गुलमर्ग आणि पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी याच ठिकाणी ट्रेनिंग घेतलं होते. सैयदना बिलाल कॅम्प मुजफ्फराबादमध्ये शस्त्रे, विस्फोटके आणि जंगल सर्व्हायवलची ट्रेनिंग दिली जात होती. कोटली गुरपुर कॅम्प लश्करचे आहे. याच ठिकाणी पूँछमध्ये २०२३ मध्ये झालेल्या हल्ल्यातील दहशतवादी होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.