Operation Sindoor Viral Video X
देश विदेश

Operation Sindoor : ४ ड्रोन आले अन् सगळं उद्ध्वस्त झालं, पाकिस्तानी तरुणाने सांगितली ऑंखोदेखी

Operation Sindoor Viral Video : मध्यरात्रीच्या वेळेस भारताने पाकिस्तानतील दहशतवादी अड्ड्यांवर एअर स्ट्राईक केली. एअर स्ट्राईकची घटना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला. भारताच्या तिन्ही सेना दलांनी एकत्रितपणे ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. ७ मे रोजी पहाटे १.४४ वाजता भारताने एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्याचे साक्षीदार असलेल्या पाकिस्तानी स्थानिक नागरिकाने ऑपरेशन सिंदूरबद्दल माध्यमांना माहिती दिली. या नागरिकाचा व्हिडीओ एएनआयने प्रसिद्ध केला आहे.

'रात्रीचे १२.४५ वाजले होते. आम्ही सर्वजण झोपलो होतो. अचानक एक ड्रोन आला, त्याच्या पाठोपाठ आणखी तीन ड्रोन आले आणि ड्रोन्सनी मशिदींवर हल्ला केला.. आणि सर्व काही उद्ध्वस्त झाले', असे या पाकिस्तानी स्थानिक नागरिकाने माध्यमांना सांगितले. हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर त्या स्थानिक पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल झाला.

भारताच्या तिन्हीही सैन्यदलांनी संयुक्तपणे ऑपरेशन सिंदूर राबवले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील ९ ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद (जेईएम), लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि हिजबुल मुजाहिदीन या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित ८० हून अधिक दहशतवादी ठार झाले अशी माहिती समोर आली आहे.

एअर स्ट्राईक झालेल्या नऊ ठिकाणांपैकी चार ठिकाणे पाकिस्तानच्या आत होती. तर उर्वरित पाच ठिकाणे पाकव्याप्त काश्मीर येथे होती. भारताने फक्त २५ मिनिटांमध्ये एअर स्ट्राईक करुन पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांना धडा शिकवला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर सीमावर्ती भागावर पाकिस्तानने गोळीबार केला. या भ्याड हल्ल्याला भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर शरद पवारांच्या भेटीला

Ardh Kendra Yog: 165 वर्षांनंतर या राशी छप्परफाड धन कमावणार; अर्धकेंद्र योगाने होणार भरभराट

गर्दीत लोकल पकडताना होत्याचं नव्हतं, धावत्या Local खाली महिला सापडली अन्...

Lunch And Dinner Time: दुपार आणि संध्याकाळच्या जेवणाची योग्य वेळ कोणती?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडणार? महत्त्वाचं कारण आले समोर, वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT