eknath shinde yandex
देश विदेश

India-Pakistan War : भारतीय सैन्य पाकिस्तानचा नाश करतील, नकाशावर राहणार नाही - एकनाथ शिंदे

Eknath Shinde on India vs Pak War : पाकिस्तानची भारतावर हल्ला करण्याची औकात नाही. पाकड्यांनी हल्ला केला तर नकाशावर राहणार नाहीत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Namdeo Kumbhar

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून वारंवार भारतावर हल्ला केला जात आहे, भारताकडूनही पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानने गुरूवारी रात्री जम्मू काश्मीर आणि राजस्थानमध्ये ड्रोन आणि मिसाईलने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला. भारताने प्रत्युत्तर दाखल पाकिस्तानवर हल्ला करत अद्दल घडवली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हल्ल्याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तान नकाशावर राहणार नाही, असे वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलेय. नागपूरमध्ये एएनआयसोबत बोलताना एकनाथ शिंदेंनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.

भारतावर हल्ला करण्याची पाकिस्तानची औकात नाही. पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला भारताने परतवला आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, तर ते नकाशावर राहणार नाहीत, असे एकनाथ शिंदे नागपूरमध्ये म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानला गंभीर इशारा दिला. पाकिस्तानने हल्ला केला तर भारतीय सैन्य जशास तसे प्रत्युत्तर देतील. पाकिस्तानचा नाश केला जाईल, एकदिवस ते नकाशावर राहणार नाहीत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले की, "पाकिस्तानमध्ये भारतावर हल्ला करण्याची हिंमत नाही. भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. आता जर पाकिस्तानने भारताविरुद्ध हल्ला करण्याचा हिंमत केली, तर आपले सशस्त्र सैन्य पाकिस्तानचा नाश करतील. पाकिस्तान नकाशावर दिसणार नाही. ऑपरेशन सिंदूर हे तर फक्त ट्रेलर आहे. पाकिस्तानने जास्त शहाणपणा दाखवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला चोख प्रत्युत्तर मिळेल. आपल्या सैनिकांनी कोणत्याही नागरिकांवर हल्ला केलेला नाही. त्यांनी फक्त दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून त्यांना धडा शिकवला आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले."

पाकड्यांनी भारतावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने पाकड्यांना हल्ला हाणून पाडला. भारताने पाकिस्तानचे ड्रोन आणि फायटर जेट पाडले. एफ १६ आणि एफ १७ भारतीय हवाई दलाने पाडले. भारताने पाकिस्तानच्या दोन पायलटलाही जिवंत पकडले आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे सीमाभागात मोठा तणाव निर्माण झाला आहे. जम्मू काश्मीर आणि राजस्थानमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट करण्यात आलेय. सूरत आणि मुंबईला हायअलर्ट देण्यात आलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण आहे. कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT