online games News, Chennai crime News Tweeter
देश विदेश

ऑनलाइन 'रम्मी'मध्ये बसला आर्थिक फटका; नैराश्यातून महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

चेन्नईमधील मनाली न्यू टाऊनमध्ये 29 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केली.

साम टिव्ही ब्युरो

चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नई शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चेन्नईमधील मनाली न्यू टाऊनमध्ये 29 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. ऑनलाइन गेममधून लाखोंचे नुकसान झाल्याने या महिलेने आत्महत्या केल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे. भवानी (वय 29) असं मृत महिलेचं नाव असून रविवारी (5 मे) रात्री उशिरा भवानी यांचा मृतदेह घरातील बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. (Online Game Crime Marathi News)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानीला ऑनलाइन रम्मी खेळण्याचे व्यसन जडले होते. या व्यसनात तिने घरातील 20 तोळ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि लाखो रुपयांची रोकड गमावली. भवानीच्या कुटुंबातील सदस्यांनी तसेच नातेवाईकांनी तिला वारंवार रम्मी खेळण्यापासून दूर राहण्याचे सांगितले मात्र, तरीही भवानीने ऑनलाइन गेम खेळणे सुरूच ठेवले. ऑनलाइन गेममुळे भवानीचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच, शिवाय तिच्यावर कर्जही झाले होते. (Chennai crime News)

दरम्यान, आपल्यावर झालेल्या कर्जामुळे भवानी काही दिवसांपासून तणावाखाली होती. तिला सतत कर्ज फेडण्याची चिंता सतावत होती. आपण ऑनलाइन गेममध्ये पैसे जिंकून आणि डोक्यावरचं कर्ज फेडू असा तिचा मानस होता. त्यामुळे तिने आपल्या दोन बहिणींकडून तीन लाख रुपये उसने घेतले आणि पुन्हा ऑनलाइन गेम खेळण्यास सुरूवात केली. मात्र यातही तिचे नुकसान झाले आणि अखेर तिने तणावातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

माहितीनुसार, भवानी एका खासगी कंपनीत कामाला होती. तिचे पती बकियाराज अंबत्तूर (वय 32) हे एका बॅंकेत नोकरी करतात. दोघांचे 2016 मध्ये लग्न झाले होते. या जोडप्याला दोन मुले देखील आहेत. बकियाराज यांच्या माहितीनुसार, भवानीला ऑनलाइन गेम खेळण्याची आवड होती. गेममध्ये पैसे गमावल्यामुळे ती कर्जबाजारी झाली होती, त्यामुळे ती अनेक दिवस तणावाखाली होती. तीन पत्ती हा ऑनलाइन गेम खेळू नको असं म्हणत बकियाराज यांनी भवानीला अनेक वेळा फटकारलं देखील होतं. मात्र पैशांच्या हव्यासापोटी तिने हा खेळ सुरूच ठेवला.

दरम्यान, ऑनलाइन रम्मीत पैसे गमावून अनेक जण आत्महत्या करत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून उघडकीस येत आहेत. त्यामुळे तामिळनाडूत या गेमवर बंदी घालावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून केली जात आहे. तामिळनाडू सरकारने ऑनलाइन रम्मीवर बंदी घालण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी राजकीय पक्षांनी केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajrang Dal Vandalism Mall: बजरंग दलाच्या ३०-४० कार्यकर्त्यांचा राडा; धर्म विचारून रायपुरच्या मॅग्नेटो मॉलमध्ये तोडफोड

Old Is Gold उमेदवारीचा भाजपचा फाॅर्म्युला ठरला, त्या नगरसेवकांना पुन्हा संधी|VIDEO

Karjat Tourism : ट्रेकिंग अन् हायकिंगसाठी कर्जतजवळील भन्नाट लोकेशन, न्यू इयर वीकेंड 'येथे' प्लान करा

Shocking: कुत्र्याची हत्या, सशाचे मटण सांगून गावभर विकले; खाताच गावकऱ्यांची प्रकृती खालावली, तरुणाने असं का केलं?

Coconut Truffles: न्यू इयर करा स्पेशल! लहान मुलांसाठी बनवा झटपट टेस्टी आणि हेल्दी नारळाचे ट्रफल; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT