Cyber fraud Saam tv
देश विदेश

Youtube व्हिडीओ लाईक करण्याच्या नादात गमावले 10 लाख रुपये; या 5 चुका कधीच करु नका

फसवणूक करणाऱ्यांनी पीडितेला टेलिग्राम अॅपवर यूट्यूब व्हिडिओ पाहण्यास आणि लाईक करण्यास सांगितले होते.

साम टिव्ही ब्युरो

Online Fraud : सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधून काढत असतात. फसवणुकीचे बळी ठरु नये म्हणून नागरिकांना काही गोष्टींची खबरदारी घेण्याची गरज असते. दरम्यान ऑनलाईन फसवणुकीचा असाच एक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये युट्यूब व्हिडीओ लाईक करण्याच्या नादात एका महिलेने 10 लाख रुपये गमावले आहेत.

गुरुग्राममधील एक महिला सोशल मेसेजिंग अॅप टेलिग्रामच्या माध्यमातून 10 लाखांहून अधिक रुपयांच्या फसवणुकीची बळी ठरली आहे. शानू प्रिया वार्ष्णे असं फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, फसवणूक करणाऱ्यांनी पीडितेला टेलिग्राम अॅपवर यूट्यूब व्हिडिओ पाहण्यास आणि लाईक करण्यास सांगितले होते. यातून कमाईची संधी असल्याचं तिला भासवलं गेले.

शानू प्रियाने सांगितले की, तिला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन करण्यात आले आणि यूट्यूबवरील काही व्हिडिओ लाईक करा आणि काही पैसे मिळवा असं सांगितलं. डिजिटल मार्केटिंगमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल, असा मेसेत त्यात होता. यात महिलेला यूट्यूबवर काही व्हिडिओ पाहण्यास आणि लाईक करण्यास सांगितले गेले. सुरुवातीला महिलेला या कामाचे काही पैसेही मिळाले.

त्यानंतर व्हीआयपी मेंबरशिपच्या नावावर 2 फेब्रुवारीला महिलेकडून आठ हजार रुपये मागितले गेले. महिलेचे खाते दुसर्‍या वेबसाइटवर रजिस्टर झाले आणि तिने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. 4 फेब्रुवारी रोजी महिलेने सुपर व्हीआयपी मेंबरशिपच्या नावावर अधिक पैसे ट्रान्सफर केले. असे करताना, महिलेने पोर्टलवर 10,75,000 रुपये जमा केले.

जेव्हा त्याने परतावा किंवा नफा मागितले तेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी 4 लाख रुपये भरण्यास सांगितले. यामध्ये आपली फसवणूक झाल्याचं कळताच महिलेना याबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

ऑनलाइन फसवणूक होऊ नये साठी 5 गोष्टी लक्षात ठेवा

  1. आकर्षक ऑफर्सच्या मागे पडू नका. नेहमी लक्षात ठेवा की पैसे मिळवण्याचा कोणताही सोपा किंवा शॉर्टकट मार्ग नाही.

  2. तुमची वैयक्तिक माहिती अगदी तुमचा पत्ताही अज्ञात लोकांसोबत कधीही शेअर करू नका.

  3. तुमचे सोशल मीडिया अकाऊट्स प्रायव्हेट ठेवा. नवीन फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी नेहमी थोडा विचार करा.

  4. अनोळखी लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणं टाळा.

  5. ऑनलाइन आर्थिक व्यवहारात अडकू नका. यामुळे तुमचे पैसे बुडण्याचा धोका असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

Sanjay Raut : आनंद दिघे नेते नव्हते, बाळासाहेबांच्या शेजारी त्यांचा फोटो का? संजय राऊतांचा सवाल

Liquor License : नेत्यांच्या कंपन्यांना मद्यविक्री परवाने नाही | पाहा VIDEO

Shocking: धक्कादायक! पोलिसाच्या गाडीने तरूणाला चिरडले, जागेवरच मृत्यू; ASI आणि कॉन्स्टेबलला ठोकल्या बेड्या

Maharashtra Rain : महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर होणार का? जाणून घ्या सरकारचे A टू Z निकष

SCROLL FOR NEXT