Shreyas Iyer
Shreyas Iyergoogle

Shreyas Iyer : टीम इंडियाला मोठा धक्का, उपकर्णधार गंभीर जखमी, ३ आठवडे संघाबाहेर

Shreyas Iyer injury update from BCCI : सिडनी वनडेत झेल घेताना टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरच्या बरगडीला दुखापत झाली. सुरुवातीच्या अहवालांनुसार त्याला किमान तीन आठवडे विश्रांती घ्यावी लागेल.
Published on

Team India vice captain ruled out of South Africa tour : ऑस्ट्रेलियाविरोधातील अखेरचा सामना जिंकून टीम इंडियाने शेवट गोड केला. पण या सामन्यावेळी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान उपकर्णधार श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली. हर्षित राणाच्या गोलंदाजीवर अ‍ॅलेक्स कॅरीचा झेल घेताना अय्यरच्या डाव्या बरगडीला दुखापत झाली. सुरुवातीच्या अहवालांनुसार तो किमान तीन आठवडे क्रिकेटपासून दूर राहू शकतो. आगामी दक्षिण आफ्रिकाविरोधात होणाऱ्या वनडेत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

शनिवारी अय्यर डीप स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी हर्षित राणाच्या चेंडूवर अॅलेक्स कॅरीने जोरात फटका मारला. अय्यरने झेल घेण्यासाठी एक उत्तम डायव्ह मारली, परंतु त्याच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांचे पथक ताबडतोब मैदानावर पोहोचले आणि अय्यरला तपासणीसाठी सिडनी येथील रुग्णालयात नेण्यात आले.

Shreyas Iyer
Phaltan Doctor Death Case : फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी बातमी! गोपाळ बदनेचं आत्मसमर्पण, तपासाला वेग

अय्यर तीन आठवड्यांसाठी मैदानाबाहेर

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला अय्यरच्या दुखापतीबाबत माहिती दिली. त्याने सांगितले की, "सामनावेळी श्रेयस अय्यरला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सुरुवातीच्या स्कॅनमध्ये बरगडीला दुखापत झाल्याचे दिसून आले आहे. त्याला किमान तीन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर हेअरलाइन फ्रॅक्चर असल्याचे आढळले तर बरे होण्यास जास्त वेळ लागू शकतो."

Shreyas Iyer
Vande Bharat Express : पुण्याहून धावणार आणखी एक वंदे भारत, ५५० किमीचा प्रवास फक्त ७ तासात, वाचा कोणकोणते थांबे असतील?

आफ्रिकाविरोधात खेळण्यावर प्रश्नचिन्ह

दरम्यान, श्रेयस अय्यरला रूग्णालयातून परतल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दाखल व्हावे लागणार आहे. त्या ठिकाणी अय्यरच्या दुखापतीची चाचपणी करण्यात येईल. फिटनेस अहवाल आल्यानंतरच तो टीम इंडियामध्ये कधी परतू शकेल, याबाबत स्पष्ट होईल. या दुखापतीमुळे अय्यरचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील सहभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भारताचा पहिला एकदिवसीय सामना ३० नोव्हेंबर रोजी रांची येथे खेळला जाईल आणि तोपर्यंत अय्यर तंदुरुस्त होईल की नाही हे सध्या स्पष्ट नाही.

Shreyas Iyer
भरधाव कारने ८ जणांना चिरडलं, ५ जणांचा जागेवरच मृत्यू, महामार्गावर मृत्यूचं तांडव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com