ONION PRICE ₹65, SUGAR ₹71 saam tv
देश विदेश

कांदा २५ वरून ६५ रुपयांपर्यंत, साखर ४४ रुपयांवरून ७१ पर्यंत, महागाईनं कंबरडं मोडलं; सरकार दिलासा देणार का?

Onion Price Increased From 25 To 65 Rupees In India: कांद्याचा भाव 25 रुपयांवरून 65 रुपयांपर्यंत पोहोचला असून साखरेचा दर 71 रुपये किलोवर गेला आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आले असून ‘कांदा एक्स्प्रेस’, साठेबाजांवर कारवाई आणि कच्च्या साखरेच्या आयातीसारखे मोठे निर्णय घेतले जात आहेत.

Omkar Sonawane

श्रावण आणि चातुरमासमध्ये अनेकज्न कांदा खात नसले नसले तरी कांद्याच्या आणि साखरेच्या किंमतीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. महिन्याभरापूर्वी 25 रुपये किलो मिळणारा कांदा अनेक ठिकाणी 65 रुपयांच्या पुढे गेला आहे. तर साखरेचा भाव देखील 70 रुपये किलोच्या वर पोहोचला आहे. वाढत्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार आता अॅक्शन मोडमध्ये आले आहे.

कांद्याचे दर वाढण्यामागचे कारण काय?

देशभरात कांद्याच्या किमती झपाट्याने वाढण्यामागे मागणीत अचानक झालेली वाढ नसून जुन्या रब्बी कांद्याचा साठा संपत येते आणि नवीन पिकांची आवक सुरू होण्यामधील हंगामी तफावत हे प्रमुख कारण आहे. आकडे वारी नुसार, 22 ऑगस्ट रोजी देशात कांद्याची सरासरी किंमत 42 रुपये प्रतिकिलो इतकी होती. ही किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत 45 टक्के आणि मागील महिन्याच्या तुलनेत 19 टक्के अधिक आहे. दिल्लीत कांदा 65 रुपये किलोपर्यंत पोहोचला असून वर्षभरापूर्वी त्याचा भाव 35 रुपये होता. चेन्नईतही कांद्याचा दर 58 रुपये किलो इतका होता. तर गेल्या वर्षी याचवेळी 33 रुपये किलो होता. भारतात कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणात ही हंगामी आवकवर अवलंबून असते. मार्च-एप्रिलदरम्यान तयार होणारे रब्बी कांद्याचे पीक हे देशातील प्रमुख साठवणुकीचे पीक आजहे. याच साठयातून अनेक महीने बाजाराची गरज भागवली जाते आणि साधारणपणे ऑक्टोबरपर्यंत पुरवठ्याचा प्रमुख स्त्रोत असतो.

मात्र, यंदा जुन्या कांद्याच्या साठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात मार्च-एप्रिलदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उशिरा तयार होणाऱ्या पिकासह साठवून ठेवलेल्या कांदा ही कमी होत चालला आहे. आता जुना साठा झपाट्याने कमी होत असल्याने त्याचा परिणाम किमतींवर दिसून येत आहे.

10 दिवसांत साखर तब्बल 17 रुपयांनी महागली

देशातील प्रमुख शहरांमध्ये ऑगस्टच्या शेवटी साखरेच्या किमतींमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. 12 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या केवळ 10 दिवसांच्या कालावधीत साखर प्रति किलो 14 ते 17 रुपयांनी महागली आहे. गुवाहाटीत साखरेच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली असून, 12 ऑगस्टला 54 रुपये किलो असलेली साखर 22 ऑगस्टला 71 रुपये किलोवर पोहोचली. दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांमध्ये साखरेचा दर 68 ते 70 रुपये किलोपर्यंत गेला आहे.

दिल्ली-मुंबईतही मोठी दरवाढ

आकडेवारीनुसार, 12 ऑगस्टला दिल्लीत साखरेचा भाव 54 रुपये किलो होता. 22 ऑगस्टला तो वाढून 68 रुपये किलो झाला. म्हणजेच केवळ 10 दिवसांत दिल्लीत साखर 14 रुपये किलोने महागली.

वाढत्या किमतींवर सरकार काय उपाय करत आहे?

कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने आता ‘कांदा एक्स्प्रेस’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमधून विशेष रेल्वेच्या माध्यमातून कांदा दिल्ली, चेन्नई, कोची आणि गुवाहाटीसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये पाठवला जाणार आहे. साखरेच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून साठेबाजांवर कठोर कारवाई केली जात आहे. साखर कारखान्यांवरही सरकारने नियंत्रण वाढवले असून, 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीपूर्वी साखरेच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गुजरातमधील ६० हून अधिक मासेमारी नौकांचा देवगड बंदरात आश्रय

Hair Care: ड्राय आणि फ्रिझी केसांमुळे लूक खराब होतोय? मग घरीच तयार करा 'हा' सोपा हेअरमास्क

Cabinet Meeting: राज्याला मिळणार आणखी एक न्यायालय, फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय; कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार?

Ladki Bahin Yojana : सण-उत्सव गोड होणार! लाडक्या बहिणींसाठी ३००० कोटी; फडणवीस सरकारचा शासन निर्णय

Tamarind Benefits For Glowing Skin: ग्लोईंग स्किनसाठी चिंचेचा फेसपॅक ठरेल फायदेशीर; असा बनवा घरच्या घरी

SCROLL FOR NEXT