Onion Price Saam tv
देश विदेश

Onion Price Hike : दिल्ली-मुंबईकरांना कांद्याने रडवले; ५ वर्षांनंतर नोव्हेंबरमध्ये दर गगनाला भिडले, तुमच्या शहरात किती भाव?

Onion Price Hike Update : दिल्ली-मुंबईत कांद्याचे दर वाढले आहेत. या दरवाढीमुळे ग्राहकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत.

Vishal Gangurde

Onion Price Hike : दिल्ली आणि मुंबईत कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. दिल्ली-मुंबईत एक किलो कांदा ८० रुपयांनी विकला जात आहे. मागील ५ वर्षानंतर नोव्हेंबरमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. एएनआय रिपोर्टनुसार, दिल्ली आणि मुंबईत बाजारात एक किलो कांद्याच्या किंमती ७० ते ८० रुपये झाले आहे. यामुळे सर्वसामान्यांचं किचन बजेट कोलमडलं आहे.

मागील काही दिवसांत देशातील काही शहरात कांदा महागला आहे. या दरवाढीचा ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. या शहरातील कांद्याच्या किंमती ४० ते ६० रुपये किंमतीहून ७० ते ८० रुपये किलो इतक्या झाल्या आहेत. काही शहरातील कांद्याचा भाव दुप्पटीने वाढला आहे.

कांद्याचा अचानक भाव वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरातील बाजारात ६० ते ७० रुपये किंमती दराने कांदा विक्री केली जात आहे. विक्रेत्यांचं म्हणणं आहे की,'कांदा विक्री घसरली आहे.

दरवाढीनंतरही काही जण कांद्याची खरेदी करत आहेत. या सीझनमध्ये कांद्याचे दर कमी असायला पाहिजे होते. परंतु मी ७० रुपये किलो दराने कांद्याची विक्री करत आहे. लोक आता कांदा खरेदी करण्यास टाळू लागले आहेत. सरकारला विनंती करतो की, भाज्यांचे दर कमी करण्यास महत्वाचे निर्णय घेतले पाहिजे.

८ नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत कांद्याचा एक किलो दर ८० रुपये होता. मुंबईसह देशातील इतर शहरातही कांद्याचा दर वाढला आहे. मुंबईतील एका विक्रेत्याने सांगितले की, 'कांदा आणि लसणाच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्याचं बजेट कोलमडलं आहे. मी स्वत: 360 रुपयांनी ५ किलो कांदे विकत घेतले आहेत. मला आशा आहे की, कांद्याचे दर लवकरच कमी होतील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT