देशभरात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अनेक शहरांमध्ये घाऊक बाजारात कांद्याचे दर अचानक ७० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.ज्या शहरांमध्ये ही वाढ झाली आहे त्यात राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे अलीकडेच बाजारात कांद्याचा भाव ४० ते ६० रुपये किलो होता. मात्र, या वाढीमुळे ग्राहकांना नक्कीच फटका बसणार आहे. दिल्लीतील एका भाजी विक्रेत्याने सांगितले की, कांद्याचा भाव ६०-७० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. आम्ही तो बाजारातून विकत घेतो, त्यामुळे जो काही भाव मिळतो त्याच भावाने आम्ही इथे विकतो. भाव वाढल्यामुळे कांद्याची विक्रीही कमी झाली आहे, पण तरीही लोकं काही प्रमाणात कांद्याची खरेदी करत आहेत, कारण कांदा हा इथल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे.
८ नोव्हेंबर रोजी दिल्लीत कांद्याचे दर ८० रुपये प्रतिकिलोच्या आसपास होते. अनेक राज्यांतही कांद्याचे भाव वाढले आहेत. मुंबईतीली अनेक बाजारात कांदा ७० ते ८० रुपये किलोने मिळतो. कांदा आणि लसूणचे भाव अनेक पटींनी वाढले आहेत. याचा परिणाम घरांच्या बजेटवर होत आहे.गेल्या रविवारी, आदल्या दिवसाच्या तुलनेत आवक 40% वाढली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधूनही आवक लवकरच वाढू शकते. यामुळे किमती कमी होतील.
Written By: Dhanshri Shintre.