Fire brigade personnel battle flames after ONGC gas leak in Andhra Pradesh as nearby areas are evacuated. 
देश विदेश

ONGC गॅस गळती; अनेक ठिकाणी लागली आग, दूर दूरपर्यंत पसरल्या ज्वाळा; गावं करण्यात आली खाली|Video Viral

Andhra Pradesh ONGC Gas Leak: ONGC गॅस गळतीमुळे सर्वत्र भीतीचं वातावरण पसरली आहे. अनेक ठिकाणी आगी लागल्याची घटना घडल्या आहेत. अग्निशमन दलाच्या पथक आग विझवण्याचे काम करत आहेत. तीन गावांमध्ये वीजपुरवठाही खंडित झालाय.

Bharat Jadhav

  • ओएनजीसीच्या गॅस लीकमुळे आंध्र प्रदेशमध्ये हडबड

  • अनेक ठिकाणी आग लागल्याची घटना

  • फायर ब्रिगेडच्या टीम्स घटनास्थळी दाखल

आंध्र प्रदेशातील आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यात ONGC गॅस गळती होत असून अनेक ठिकाणी आग लागल्याची घटना घडलीय. जिल्ह्यातील राजोलू टाउनच्या इरुसुमांडा आणि मलिकीपुरम विभागात ओएनजीसी गॅस गळतीमुळे भीती पसरली आहे. गॅस गळती झाल्यानं अनेक ठिकाणी आगीचा भडका उडालाय. आगीच्या ज्वाळा दूर दूरपर्यंत दिसत आहेत.

दरम्यान आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जवळपासच्या रहिवाशांनी ओएनजीसी अधिकाऱ्यांना गॅस गळतीची माहिती दिली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासकीय कर्मचारी ओएनजीसी टीमसोबत काम करत आहेत. आग भडकल्यानंतर आसपासच्या गावं खाली करण्यात आली आहेत. तेथील लोकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे.

मल्कीपुरम विभागातील इरुसुमांडा गावात गॅस गळतीची घटना घडली आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती ओएनजीसी अधिकाऱ्यांना दिली आहे. ओएनजीसीचे अधिकारी, अग्निशमन दल आणि पोलिस कर्मचारी आग शमविण्याचे काम करत आहेत. दरम्यान आगीच्या घटना घडल्यानं गावकरी घाबरले आहेत. जवळच्या तीन गावांचा गॅस आणि वीजपुरवठाही खंडित झाला आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ओएनजीसीचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी बालकृष्ण यांनी दिलीय.

ओएनजीसीच्या पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झालीय. त्यानंतर स्फोट झाल्यानंतर संपूर्ण परिसरात भीती पसरलीय. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेच्या वेळी ओएनजीसीच्या विहिरीत तांत्रिक दुरुस्तीचे काम सुरू होतं. त्याचदरम्यान गॅस गळती होऊ लागली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

Tilak Verma: टीम इंडियाच्या टी २० वर्ल्डकप मिशनला जबरा धक्का; भारत-न्यूझीलंड मालिकेतील ३ सामन्यांमधून धुरंधर तिलक वर्मा बाहेर

बिनविरोधनंतर आता बिनशर्तचा धडाका, ऐन निवडणुकीत ठाकरेंचा उमेदवार शिंदेसेनेत

SCROLL FOR NEXT