Maharashtra Politics: आता भाजपमध्ये बंड होणार? मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात एक गट सक्रिय, बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडणारा गौफ्यस्फोट केलाय. महापालिका निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भाजपमध्ये एक अंतर्गत गट सक्रिय झाला असल्याचं नाना पटोले म्हणालेत.
Maharashtra Politics:
Congress leader Nana Patole makes a sensational claim about internal unrest within BJP ahead of civic elections.saam tv
Published On
Summary
  • महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं

  • नाना पटोले यांचा भाजपविरोधात मोठा दावा

  • मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात गट सक्रिय असल्याचा आरोप

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय. निवडणुकांपूर्वीच भाजपचे ४४ नगरसेवक जिंकलेत. कल्याण डोंबिवलीसह काही महापालिकेत महायुतीचे जवळपास ६८ नगरसेवक बनिविरोध निवडून आलेत. त्यावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलीय. याचदरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिंता वाढवणारा दावा केलाय. सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजवीर भाष्य करताना एक मोठा दावा केलाय. भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रिय झालाय, असे म्हणत नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीवर भाष्य केलं.

Maharashtra Politics:
Kalyan : आपोआप कोणीही बिनविरोध होत नाही... कपिल पाटलांची ठाकरे बंधूंवर सणसणीत टीका

नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे म्हणत नाना पटोले यांनी नाव न घेता भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांना चिमटा काढला. विधानसभा अध्यक्षांकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणलेल्या दबावावरुन त्यांना बदलण्याची मागणीही पटोले यांनी केली. विधिमंडळाची परंपरा आहे, लोकांना न्याय मिळेल, विरोधकांना न्याय मिळेल ही भूमिका असली पाहिजे. निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत, असे म्हणत निवडणूक आयोगावरही त्यांनी हल्लाबोल केला.

Maharashtra Politics:
Maharashtra Politics: मोठी बातमी! सोलापुरातील राजकारण फिरणार; काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे भाजपात जाणार,बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

शेतकऱ्यांच्या कर्जावरील स्टँप ड्युटी माफ करण्याच्या निर्णयावरूनही नाना पटोले यांनी टीका केली. निवडणुकीच्या तोंडावर केलेली ही घोषणा आहे, ही कर्ज घेण्याची वेळ नाही, आधी घोषणा केली असती तर फायदा झाला असता, असं नाना पटोले म्हणाले. मुनगंटीवार यांच्यावरून बोलताना त्यांनी मोठा गौफ्यस्फोट केलाय. भाजपमध्ये भविष्यात स्फोट होईल, मुख्यमंत्री विरोधात गट सक्रिय झाला आहे.

कुणाला जर याचे वाईट परिणाम भोगावे लागत असतील तर ते शेतकऱ्यांना भोगावे लागते, असाही गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केला. भाजपवाले मानसिक आजारी झालेत, सत्तेचा माज आलाय. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल मोठा रोष आहे, याचा उद्रेक होईल. लोकांचे मत घेण्यासाठी हिंदू, मुस्लिम, मराठी, हिंदी या विषयांवर राजकारण सुरू असल्याचं नाना पटोले यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com