Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video : 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी आईने मुलीला रंगेहाथ पकडलं; राग अनावर झाल्याने आई नं दिली कठोर शिक्षा

मुलगी आहे म्हणून आई थांबत नाही, तर ती मुलीला देखील चपलेने मारण्यास सुरुवात करते.

Ruchika Jadhav

Viral Valentine Day Video : नुकताच 'व्हॅलेंटाईन डे' साजरा झाला आहे. या दिवशी सर्वजण आपलं प्रेम व्यक्त करतात. आपल्या मनातील भावना आपल्या साथीदारासमोर व्यक्त करतात. अनेक तरुण तरुणी या दिवसाचे सुंदर क्षण आपल्या फोनमध्ये कैद करतात आणि सोशल मीडियावर देखील शेअर करताना दिसतात. (Latest Viral Valentine Day Video)

'व्हॅलेंटाईन डे' सेलिब्रेट करण्यासाठी अनेक जण वेगवेगळं प्लॅनिंग करतात. अशात या दिवशी तरुणाईचा उत्साह आणि आनंद गगणात मावेनासा असतो. महिनाभर आधीच प्लॅनिंग केल्यावर हा दिवस साजरा करतात. यात कोणी कॅफेमध्ये एकत्र कॉफीचा अस्वाद घेतात. तर कुणी डिनर किवा लंचसाठी रेस्टॉरंटमध्ये जातात.

मात्र यंदाचा 'व्हॅलेंटाईन डे' एका जोडप्याला चांगलाच महागात पडला आहे. त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल असा त्यांचा प्रेमभंग झाला आहे. प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी हे दोघे एका छान रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. तरुण त्याच्या प्रेयसीला त्याच्या हाताने भरवत होता. मागे रोमँटीक गाणं सुरू होतं. त्या संपूर्ण वातावरणात दोघेही दंग झाले होते.

तितक्यात तिथे तरुणीची आई येते. मुलीला तिच्या प्रियकराबरोबर पाहून आईच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ती आपल्या मुलीला आधी जोरदार कानशिलात लगावते. त्यानंतर आई त्या मुलाला शिवीगाळ करत मारहाण करू लागते. आईला राग इतका अनावर झालेला असतो की, ती सरळ त्या मुलाला चपलेने मारहाण करते. प्रियकराला होत असलेली मारहाण पाहून मुलीला देखील यातना होतात.

आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी ती मध्ये पडते. मात्र यात तिला आणखीन चोप मिळतो. आपली मुलगी आहे म्हणून आई थांबत नाही, तर ती मुलीला देखील चपलेने मारण्यास सुरुवात करते. या घटनेचा फनी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. अनेक नेटकरी हा व्हिडीओ पाहून तरुण आणि तरुणीच्या परिस्थितीवर हसत आहेत. तर काहींना या गोष्टीचे वाईट वाटत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जुलैचा हप्ता खात्यात कधी जमा होणार? तारीख आली समोर; पण नाव वगळण्यात आलं असेल तर? 'असं' करा चेक

Maharashtra Live News Update : - पुण्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने लक्ष्मीनारायण चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू

Manikrao Kokate: रमीला ऑलम्पिकमध्ये मान्यता मिळणार; कोकाटेंना क्रीडा खातं मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा चिमटा|VIDEO

Yavat Pune : यवत हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई, २२ जणांना अटक

2025 Raksha Bandhan: 9 ऑगस्ट रक्षाबंधनच्या ओवाळणीचा शुभ मुहूर्त काय? वेळ, महत्व आणि खास मंत्र घ्या जाणून

SCROLL FOR NEXT