Breaking: अखेर भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव; कर्नाटकात 2 रुग्ण आढळले Saam Tv
देश विदेश

Breaking: अखेर भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव; कर्नाटकात 2 रुग्ण आढळले

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मोठा खुलासा.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा अत्यंत धोकादायक प्रकार मानल्या जाणाऱ्या ओमायक्रॉन प्रकाराने भारतात शिरकाव केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज अशी माहिती देण्यात आली देशात ओमाक्रॉनची दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या बाधितांवर उपचार सुरू आहेत. हे दोन्ही रुग्ण काल ​​रात्री पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले होते.

देशातील ओमायक्रॉनच्या प्रकरणांची माहिती देताना, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले की, देशात आतापर्यंत ओमायक्रॉनची 2 प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि दोन्ही प्रकरणे कर्नाटकात आढळून आली आहेत. ज्या 2 रुग्णांमध्ये ओमायक्रॉनची पुष्टी झाली आहे, त्यापैकी एक 66 वर्षीय पुरुष आहे तर दुसरा 46 वर्षीय पुरुष आहे. त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.

ते म्हणाले की, दोन्ही बाधितांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. बाधित लोकांवर उपचार सुरू आहेत. यासोबतच या संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांवरही नजर ठेवण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत 29 देशांमध्ये ओमायक्रॉनचे 373 रुग्ण आढळले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) हवाल्याने सांगितले की, Omicron प्रकार कोरोनाच्या डेल्टा प्रकारापेक्षा 5 पट जास्त धोकादायक आहे आणि त्याचा वेगाने प्रसार होण्याची भीती आहे. त्यांनी सांगितले की तो 29 देशांमध्ये पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याला चिंतेच्या प्रकारात समाविष्ट केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: परतीच्या पावसानं बिघडवलं रेल्वेचं वेळापत्रक; मध्यरेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने

Vastu Tips Of Home Cleaning: रविवारी घराची साफ- सफाई करताय? लादी पुसण्याची योग्य वेळ कोणती?

Kande Pohe: कांदेपोहे कधी चिकट तर कधी वातड होतात? मग या 8 टिप्स करा फॉलो

Maharashtra Live News Update: पावसामुळे मध्यरेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने

Diva-Chiplun Memu Train : कोकणवासीयांसाठी आनंदवार्ता! दिवा-चिपळूण मेमोला कायमस्वरूपी हिरवा कंदील, जाणून घ्या वेळापत्रक

SCROLL FOR NEXT