OLA S1 इलेक्ट्रिक स्कूटर अखेर भारतात लॉंच, जाणून घ्या किंमत
OLA S1 इलेक्ट्रिक स्कूटर अखेर भारतात लॉंच, जाणून घ्या किंमत File Photo
देश विदेश

OLA S1 इलेक्ट्रिक स्कूटर अखेर भारतात लॉंच, जाणून घ्या किंमत

Krushnarav Sathe

वाढत्या इंधन दर आणि प्रदूषणाला उपाय म्हणून सध्या इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ तेजीत आहेत. याच वाहन प्रकारात ओला कंपनीने दमदार एन्ट्री केली आहे. ओला कंपनीने OLA S1 स्कूटर च्या प्रीबुकिंग मोहिमेत जवळपास एक लाख नोंदणीचा टप्पा अगोदरच पार केला आहे. त्यामुळे ओला ची बहुचर्चित असलेली ई-स्कूटर आज अधिकृतपणे भारतीय बाजारात लॉंच करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने ओला कंपनीने आपली बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक स्कूटर OLA S1 लॉंच केली आहे. अत्यंत आकर्षक असणाऱ्या या स्कूटर ची किंमत 99,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्कूटर ला कंपनीने S1 आणि S1 Pro दोन व्हेरीएंट मध्ये सादर केले आहे. त्यामुळे येत्या काळात हि स्कूटर भारतात Bajaj Chetak आणि Tvs iQube या इलेक्ट्रिक स्कूटरला जोरदार टक्कर देणार आहे.

स्पीड आणि रेंज :

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरला ताशी 115 किमी क्लास-लीडिंग टॉप स्पीड मिळते. तसेच एका चार्जिंग मध्ये तब्बल 181 किमी अंतर पार करण्याची क्षमता या स्कूटर मध्ये असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ओला कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी काही आठवड्यापूर्वीच नोंदणी सुरु केली होती. यामध्ये केवळ 499 रुपये टोकन रक्कम ठेवण्यात आली होती. फक्त 24 तासांत एक लाख पेक्षा अधिक लोकांनी या स्कूटरसाठी प्री बुकिंग केले होते.

कधी होणार ग्राहकांसाठी उपलब्ध ?

कंपनीचे म्हणणे आहे कि, 8 सप्टेंबर 2021 पासून OLA S1 आणि S1 PRO ग्राहक खरेदी करू शकतील. सध्या तरी देशात या स्कूटर साठी डिलरशिप उपलब्ध नसून थेट कंपनी ते ग्राहक अशी विक्री होणार आहे. हि स्कूटर 10 कलर मध्ये उपलब्ध असणार आहे.

By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

Special Report : निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद, आयोगावर नेमका कुणाचा दबाव?

SCROLL FOR NEXT