Odisha Train Accident
Odisha Train Accident Saam Tv
देश विदेश

Odisha Train Accident: ओडिशात 3 रेल्वे एकमेकांना धडकल्या! 50 जणांचा मृत्यू, मृतांना 10 लाखांची मदत जाहीर

Satish Kengar

Odisha Train Accident: ओडिशात झालेल्या रेल्वे अपघात संदर्भात आता नवीन माहिती समोर आली आहे. या अपघातात तीन रेल्वे एकमेकांना धडकल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये दोन एक्सप्रेस तर एक मालगाडी असल्याचं सांगण्यात येत आहे.

या अपघातात आतापर्यंत 50 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 400 प्रवासी जखमी झाल्याची माहिती ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिली आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर

या अपघात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. ते उद्या अपघातस्थळी भेट देणार आहेत. मदतीबाबत माहिती जाहीर करताना त्यांनी ट्वीट केलं आहे की, मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख, गंभीर जखमींना 2 लाख आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

इतर जिल्ह्यातून 50 डॉक्टरांना बोलवण्यात आलं

ओडिशाच्या आरोग्य सचिवांनी सांगितले की, सुमारे 50 रुग्णवाहिका घटनास्थळी आहेत. मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे पथक घटनास्थळी आहे. याशिवाय इतर जिल्ह्यातून 50 डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आहे. भुवनेश्वर आणि कटकमधील खासगी रुग्णालयांनाही रुग्णांना दाखल करण्यास सांगितले आहे.

या भीषण अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेनंतर मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा- प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणारा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Hit and Run Case | अल्पवयीने मुलाने दोघांना चिरडले! वडिलांवर होणार गुन्हा दाखल

Vidula Chougule : तुला पाहून सूर्यफूलही लाजून कोमेजलं...

Hingoli Water Crisis | Saam Tv च्या बातमीमुळे काय झालं बघाच!

Sanjay Raut | "त्यांनाच शिंदे नको होते.." राऊतांनी नावं घेत सगळंच सांगितलं..

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर तुफान पाऊस; निवळी घाटात साचलं पाणी, वाहतुकीला अडथळा

SCROLL FOR NEXT