odisha train accident Saam Tv
देश विदेश

Odisha train Accident : काळजाच्या तुकड्यासाठी अ‍ॅम्बुलन्ससह 230 किमी अंतर कापून बालासोर गाठलं; मुलाला शवागारात पाहिलं अन्...

Odisha Train Accident : वडिलांच्या आपल्या लेकावरील प्रेमामुळे विश्वजीत शवागारात गेल्यानंतरही वाचला आहे.

प्रविण वाकचौरे

Odisha Railway Accident : ओडिशा रेल्वे अपघातात जवळपास 275 प्रवाशांना आपले जीव गमवावे लागले आहे. अपघाताच्या तीन दिवसांनंतरही अनेकजण आपल्या घरच्यांचा शोध घेत आहे. अपघातात अनेकांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं, तर अनेकांचा आधार या अपघतात हरपला आहे.

अपघातात असे काहीजण आहेत ज्यांनी गंभीर जखमा झाल्या, मात्र त्यांचा जीव वाचला आहे. यामध्ये 24 वर्षीय विश्वजीत मलिकचाही समावेश आहे. वडिलांच्या आपल्या लेकावरील प्रेमामुळे विश्वजीत शवागारात गेल्यानंतरही वाचला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, विश्वजीतचे वडील हेलाराम मलिक काही तासांपूर्वी शालीमार स्टेशनवरून कोरोमंडल एक्सप्रेसमध्ये त्याला बसवून आले होते. अवघ्या काही तासांनी हेलाराम यांना कोरोमंडल रेल्वे अपघाताची बातमी समजली.

हेलाराम यांनी तातडीने आपल्या मुलाला फोन केला आणि त्याची विचारपूस केली. सुदैवाने विश्वजीनने फोन उचलला देखील, मात्र दुखापतीमुळे तो फार काही सांगू शकला नाही. विश्वासजीतला गंभीर दुखापत झाल्याचा अंदाज एव्हाना हेलाराम यांना आला होता. (Latest Marathi News)

त्यानंतर वडिलांनी वेळ न दवडता ताबडतोब स्थानिक रुग्णवाहिका चालकाला बोलावले आणि मेव्हणा दीपक दाससह यांच्यासोबत बालासोरला निघाले. रुग्णवाहिकेसह 230 किलोमीटरचा प्रवास करून ते बालासोरला पोहोचलो. (Train Accident)

घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्वांनी मिळून विश्वजीतचा शोध सुरू केला. मात्र तो कुठेच सापडला नाही. सर्वांच्या आशा मावळत होत्या मात्र हेलाराम आपला मुलगा जिवंत असल्याचे सांगत राहिले. घटनास्थळी मुलाची विचारपूस केल्यानंतर हेलाराम तेथील शवागारात पोहोचले.

शवागरात कुणालाही सोडत नव्हते. मात्र हेलाराम यांनी विनंती करुन प्रवेश मिळवला. तिथे एका पीडितेवर पडली, ज्याचा उजवा हाताची हालचाल सुरु होती. हेलारामने हात पाहिल्यावर तो विश्वजीत असल्याचं सांगितलं. त्यानंतर विश्वजीतला तेथून तातडीने बाहेर काढून बालासोर येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.

दुखापत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला कटक मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केले. विश्वजीतवर आता कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विश्वजीतचे हात-पाय फ्रॅक्चर असून शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. वडील हेलाराम यांनी मुलासाठी धावपळ केली नसती तर कदाचित आजची परिस्थिती वेगळी असती. मात्र हेलाराम यांच्या तत्परतेने विश्वजीतचा जीव वाचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: शून्य मेहनत! आता मटार सोलायला अर्धा तास लागणार नाही, सोशल मिडीयावर व्हायरल झाला हॅक

Municipal Elections Voting Live updates : भाजप उमेदवाराने 600 ते 650 बोगस मतदार आणल्याचा अपक्ष उमेदवाराच्या प्रतिनिधीचा आरोप

Homemade Lip Oil : लिप बाम विसरा ओठांना सॉफ्ट ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा लिप ऑईल

Pomegranate Skin Benefits : डाळिंबाच्या रसाने चेहरा सोन्यासारखा चमकेल, फक्त फॉलो करा 'या' ३ स्टेप्स

कार्यकर्ते पैसे घेऊन आले, कुटुंबाने तोंडावर नोटा उधळत हाकलून लावले VIDEO

SCROLL FOR NEXT