ओडिसातील पुरीमध्ये भगवान जगन्नाथाच्या चंदन यात्रा उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. चंदन यात्रेदरम्यान फटाक्यांच्या स्फोटामुळे १५ भाविक भाजले आहे. त्यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आज तकच्या हवाल्यानुसार मिळत आहे. या घटनेवर दु:ख व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.
ओडिसातील (Odisha News) पुरी येथे जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथाच्या चंदन यात्रा उत्सवादरम्यान फटाक्यांचा ढिगात स्फोट झाल्याची घटना काल २९ मे रोजी घडली. या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, नरेंद्र पुष्करिणी सरोवर येथे चंदन यात्रा उत्सवासाठी शेकडो भाविक जमले होते. यात्रेदरम्यान, काही भाविक फटाके फोडत होते. त्यातील एक ठिणगी फटाक्यांच्या ढिगात पडली अन् भीषण स्फोट (Firecrackers Blast) झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाके फुटल्यानंतर ते गर्दीत पडले. त्यामुळे अनेक भाविक जखमी झालेत. त्याचवेळी फटाक्यांपासून वाचण्यासाठी काही भाविकांनी तलावात उड्या घेतल्या होत्या. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चार भाविकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं (Jagannath Chandan Yatra) आहे.
या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सोशल मीडियावर, पुरी नरेंद्र पूलजवळ झालेल्या अपघाताबद्दल ऐकून दुःख झालंय. मुख्य प्रशासकीय सचिव आणि जिल्हा प्रशासनाला जखमींवर योग्य (Firecrackers Blast In Lord Jagannath Chandan Yatra) उपचार करण्याच्या आणि व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जखमींचा सर्व वैद्यकीय खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून केला जाणार आहे, अशी पोस्ट केली आहे.
या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, पुरी चंदन यात्रेदरम्यान नरेंद्र पुष्करिणी देवीघाट येथे झालेल्या अपघातात अनेक लोक जखमी झाल्याची बातमी ऐकून दुःख झाले. जखमींच्या आरोग्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.