Odisha Train Accident
Odisha Train Accident  Saam Tv
देश विदेश

Coromandel Express Accident: तेच ठिकाण, तीच कोरोमंडल ट्रेन आणि तोच शुक्रवार; 14 वर्षांपूर्वीच्या जखमा भळभळल्या

Priya More

Odisha Train Accident: ओडिशाच्या (Odisha) बालासोरमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने सूंपूर्ण देश हादरला. या अपघातामध्ये दोन ट्रेन आणि मालगाडी एकमेकांना धडकल्या. आतापर्यंत 261 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 900 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. हा देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा रेल्वे अपघात असल्याचे सांगितले जात आहे. देशामध्ये यापूर्वीही रेल्वे अपघाताच्या (Railway Accident News) अनेक घटना घडल्या आहेत.

हा अपघात 14 वर्षांपूर्वी झालेल्या एका रेल्वे अपघाताची आठवण करुन देतो. आश्चर्याची बाब म्हणजे, तो रेल्वे अपघात देखील ओडिशातील बालासोरमध्येच घडला होता आणि कोरोमंडल एक्स्प्रेसलाच तो अपघात झाला होता. इतकंच नाही तर ज्या दिवशी ही घटना घडली तो दिवस देखील शुक्रवारचाच होता. ज्या दिवशी हा अपघात घडला ती 13 फेब्रुवारी 2029 ही तारीख होती.

ही घटना घडली त्यावेळी कोरोमंडल एक्स्प्रेस चेन्नईच्या दिशेने जात होती. ही ट्रेन खूपच वेगात होती. त्याचवेळी अचानक ट्रनेचे 16 डबे रुळावरुन घसरले. यामध्ये 11 स्लिपर क्लास आणि दोन जनरल क्लासचे डबे होते. या अपघातामध्ये रेल्वे डबे एकमेकांवर चढले होते. या रेल्वे अपघातामध्ये त्यावेळी 16 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर 161 प्रवासी जखमी झाले होते.

शुक्रवारी ओडिशाच्या बालासोर येथे झालेला अपघात खूपच भयानक होता. या अपघातामध्ये दोन ट्रेन आणि एक मालगाडी एकमेकांना धडकली. या दोन प्रवासी ट्रेनमध्ये जवळपास तीन ते चार हजार लोकं प्रवास करत होते. या अपघातामध्ये दोन्ही ट्रेन, मालगाडी आणि रेल्वे रुळाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावर अजूनही बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या टीमसोबतच आर्मी आणि एअरफोर्सची टीम घटनास्थळी बचावकार्य करत आहेत.

एअरफोर्सची टीम हेलिकॉप्टरच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करत आहेत. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर गंभीर जखमींना 2 लाख आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी एक दिवसीय राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे 3 जून रोजी संपूर्ण राज्यात कोणताही सण किंवा उत्सव साजरा होणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan House Firing Case : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक

Live Breaking News : पालघरचे खासदार राजेंद्र गावित घरवापसी करणार

Best Time To Eat Curd: जेवणाआधी की नंतर, दही कधी खावा?

Weightloss Tips: झटपट वजन होईल कमी; आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Hardik Pandya Statement: 'मी स्वत:ला भाग्यवान समजतो..' मुंबईच्या विजयानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?

SCROLL FOR NEXT