Om Prakash Rajbhar latest news साम टीव्ही मराठी
देश विदेश

कॅबिनेट मंत्र्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट, भाजप कार्यकर्त्यांना मारण्याची दिली होती धमकी

उत्तर प्रदेशचे मंत्री ओमप्रकाश राजभर यांच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. कोर्टात अनुपस्थित राहिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांना धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.

Namdeo Kumbhar

Om Prakash Rajbhar latest news : उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करण्याची आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) जारी केले आहे. मऊ जिल्ह्यातील २०१० लोकसभावेळी झालेल्या जुन्या प्रकरणात न्यायालयाने ही कठोर कारवाई केली. कोर्टाच्या या निर्णायामुळे उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशमधील मऊच्या न्यायालयाने कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. मुख्य न्यायदंडाधिकारी डॉ. कृष्ण प्रताप सिंह यांनी भाजप कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आणि चपलेने मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हे वॉरंट जारी केल्याची माहिती एनबीटीने दिली आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल ओम प्रकाश राजभर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोकसभा निवडणूक प्रचारावेळी रतनपुरा बाजार येथील एका जाहीर सभेत ओम प्रकाश राजभर यांनी भाजप नेत्यांविरुद्ध कथितरित्या अपमानजनक वक्तव्य केले होते. स्टेजवरून राजभर यांनी भाजप नेत्यांना चपलेने मारण्याची धमकी दिल्याचा त्यांचावर आरोप आहे. भाजपच्या एका नेत्याने या प्रकरणी कोर्टात धाव घेतली होती.

ओम प्रकाश राजभर यांना कोर्टाने अनेकदा हजर राहण्याचे समन्स बजावले होते. पण राजभर कोर्टात हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायाधिशांनी भूमिका घेत अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. समन्स बजावूनही ते हजर न राहणे हा न्यायालयाचा अवमान आहे, असे न्यायालयाने वॉरंट काढता म्हटले. दरम्यान, अजामीनपात्र वॉरंटमध्ये आरोपीला तात्काळ जामीन मिळत नाही. पोलिसांना आरोपीला अटक करून थेट न्यायालयासमोर हजर करण्याचे निर्देश दिले जातात. आरोपी न्यायालयासमोर हजर झाल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पारंपारिक चव आणि आरोग्याचा खजिना असलेली लाल माठाची भाजी तुम्ही कधी खाल्लीये का? गावरान स्टाईल सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: अकोल्यात टॉवर चौकात वंचित कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आंदोलन

Heartburn Remedies: छातीत जळजळ झाल्यास हे 3 उपाय करताय तर आताच सावध व्हा; नाहीतर त्रास अजून वाढेल

Famous Actor Divorce : २० वर्षांच्या संसारानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट? अखेर त्याने सोडले मौन, म्हणाला...

Bribe Case : धक्कादायक! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा सापडला जाळ्यात

SCROLL FOR NEXT