Nokia 105 4G (2023) Saam Tv
देश विदेश

Nokia 105 4G (2023): स्वस्तात खरेदी करा नोकियाचा 'हा' नवा फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!

Nokia Feature Phone Launched: जुन्या Nokia 105 4G च्या तुलनेत नवीन फोनमध्ये अनेक अपग्रेड्स पाहायला मिळणार आहेत.

Priya More

Nokia New Mobile Launch: नोकिया कंपनीच्या (Nokia Company) मोबाईला ग्राहकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्ससह मोबाईल मार्केटमध्ये आणत असते. नुकताच नोकिया कंपनीने Nokia 105 4G ची नवीन व्हर्जन लॉन्च केला. हा फोन बॅटरी आणि इतर फीचर्समध्ये बदल करून लॉन्च करण्यात आला आहे. यावरुन असा अंदाज लावता येऊ शकतो की, जुन्या Nokia 105 4G च्या तुलनेत नवीन फोनमध्ये अनेक अपग्रेड्स पाहायला मिळणार आहेत.

Nokia 105 4G (2023) किंमत -

नोकिया कंपनीने क्लासिक कँडी बार डिडाइनवाला Nokia 105 4G (2023) हा मोबाईल फोन 25 एप्रिलला लाँच केला. हा मोबाईल फोन नुकताच चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनची किंमत 229 युआन म्हणजे 2,715 रुपये ऐवढी आहे. पण हा फोन 199 युआन म्हणजेच 2,359 रुपयांमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फोनची विक्री 28 एप्रिलपासून सुरु होणार आहे.

Nokia 105 4G (2023) चे स्पेसिफिकेशन -

या नवीन Nokia 105 4G (2023) फोनमध्ये 42 टक्के मोठी 1450mah बॅटरी मिळत आहे. फोनमध्ये 32GB इंटरनल स्टोरेज आहे. याशिवाय नोकियाचा हा फोन ब्लूटूथ 5.0 सह येतो. फोन Migu music आणि Himalaya फंक्शनला सपोर्ट करतो. त्यात आता होल्ड बटन फॉन्ट उपलब्ध आहे. नोकियाचा हा फीचर फोन ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये उपलब्ध असणार आहे.

हा नवीन फोन क्लासिक कँडी बार डिझाइनसह येतो. यात फिजिकल बटणे आहेत. Nokia 105 4G फोन ड्युअल कार्ड, ड्युअल-स्टँडबाय आणि ड्युअल 4G फुल नेटकॉम सपोर्टसह येतो. यात ड्युअल नॅनो सिम-कार्ड स्लॉट देण्यात आले आहेत. याशिवाय फोनमध्ये UNISOC T107 चिप देण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे, नोकियाच्या या नव्या फोनमध्ये वायरलेस एफएम रेडिओचा पर्याय देण्यात आला आहे. म्हणजे युजर्स हेडफोन न लावता रेडिओवर गाणी ऐकू शकणार आहेत. तसंच फोनमध्ये फ्लॅशलाईट देण्यात आली आहे. जी एकाच बटनाच्या वापराने ऑन आणि ऑफ करु शकता. याव्यतिरिक्त या फोनमध्ये स्नेक गेम आधीपासूनच इन्स्टॉल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT